वसीम कुरेशी
नागपूर : विभागांमध्ये समन्वय नसला की किती विलंब होतो, याचा प्रत्यय सध्या रामझूला ते केपी ग्राऊंडपर्यंतच्या फ्लायओव्हर आणि मानस चौक ते कॉटन मार्केट दरम्यान उभारल्या जात असलेल्या आरयूबी प्रकल्पामध्ये येत आहे. २० जुलै २०१८ला हे काम सुरू झाले. २४ महिन्यात म्हणजेच १९ जुलै २०२१पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु मनपाकडून टेकडी रोड मेट्रोच्या सुपूर्द करण्यात आला नाही. यापूर्वीच्या फ्लायओव्हरला तोडण्याचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. यावर अधिकारी काही बोलण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने यातील रहस्य काय हे कळायला मार्ग नाही.
योजनेनुसार, जयस्तंभ चौकाजवळ रेलवे स्टेशनच्या विकासासोबतच स्टेशन रोडवर काँक्रिट रोड तयार केला जाणार आहे. केपी ग्राउंडपासून रामफुलापर्यंत दोन लेनच्या क्रॅश ॉबॅरियरसोबतच फ्लायओव्हर तयार केला जाणार आहे. तसेच मानस चौक ते कॉटन मार्केटपर्यंत नवा आरयूबी उभारला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व सेंट्रल रोड फंडाच्या मंजुरीनंतर २३४.२१ कोटी रुपयांच्या खर्चातून हे काम केले जात आहे. महामेट्रोच्या मते, अद्याप स्टेशन रोड मनपाकडून त्यांना हस्तांतरित झालेला नाही. तिकडे मानस चौकाजवळ कॉटन मार्केटच्या बाजूने आरयूबीसाठी काँक्रिट बॉक्स तयार करणे सुरू झाले आहे. रेल्वेकडे ब्लॉकसाठी कोणत्याही हालचाली नाहीत.
...
लोहा पूल होणार बंद
नव्या आरयूबीच्या बांधकामालगतचा जुना आरयुबी तसेच लोहा पूल बंद केला जाईल. यासंदर्भात मेट्रोकडे विचारणा केली असता, यावर मनपा निर्णय घेईल, असे सांगण्यात आले. मनपाच्या बांधकाम विभाग अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी मेट्रोसोबत चर्चा करण्याचे सुचविले. मनपाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता त्यांनी नगर अभियंताकडे बोट दाखविले. अखेर नगर अभियंत्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी यावर बोलायचे टाळले. सध्या तरी ब्लॉकसंदर्भात कोणताही प्रस्ताव नसल्याने रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
...
स्टेशन रोडवरील जुन्या टेकडी फ्लायओव्हरला तोडायचे आहे. परंतु मनपाकडून स्टेशन रोड हस्तांतरित होईल, तेव्हाच हे काम केले जाऊ शकते. जुना रेल्वे पूल बंद करायचा किंवा नाही याचा निर्णय मनपाला घ्यायचा आहे.
- अखिलेश हळवे, डीजीएम (सीसी), महामेट्रो
...
नव्या आरयूबीवरून वन-वे वाहतूक
अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने बांधण्यात येत असलेल्या आरयूबीवरून एकेरी किंवा दुहेरी वाहतूक असेेल, हे स्पष्ट होऊ शकले नाही. तथापि माहितीगारांच्या मते, आनंद टॉकीजजवळच्या आरयूबीवरून मानस चौकाकडे इनकमिंग होईल. जुना लोहा पूल बंद केला जाईल. नवीन आरयूबी मानस चौकातून कॉटन मार्केटकडे जाण्यासाठी वापरला जाईल.
...