शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

आता चण्यावर ६० टक्के आयात शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:45 IST

केंद्र सरकारने होळीच्या एक दिवसाआधी चण्यावरील आयात शुल्कात वाढ करून ते ६० टक्क्यांवर नेले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

ठळक मुद्देविक्रमी उत्पादन, शेतकऱ्यांना फायदा : केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने होळीच्या एक दिवसाआधी चण्यावरील आयात शुल्कात वाढ करून ते ६० टक्क्यांवर नेले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या चण्याची आधारभूत किंमत ४,४०० रुपये आहे. पण बाजारपेठेत प्रति क्विंटल ३,९०० रुपयात विक्री सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा व्हायचा.द होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले की, सरकारचा आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय योग्य, स्वागतार्ह आणि शेतकऱ्यांचा हितार्थ आहे. १५ मार्चपासून राज्य सरकार शेतकऱ्यांपासून ४,४०० रुपये क्विंटल दराने चण्याची खरेदी करणार आहे. यंदा देशात चण्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे केंद्र सरकारने विदेशातून चण्याची आयात पूर्णपणे थांबवावी. याच कारणांमुळे केंद्र सरकार आयात शुल्कात निरंतर वाढ करीत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये मसूरसोबतच चण्यावर ३० टक्के आयात शुल्क आकारले होते. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यात वाढ करून ४० टक्क्यांवर नेले. आता आणखी २० टक्के वाढवून ६० टक्के केले आहे. घरगुती बाजारात चण्याचे भाव आधारभूत किमतीपेक्षा कमी झाल्यामुळे सरकार चिंतित होती. नवीन पीक कापण्याची तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांत कापणीचा वेग वाढल्यानंतर चण्याच्या किमतीवर दबाव आणखी वाढणार आहे.केंद्राच्या निर्णयामुळे आॅस्ट्रेलिया आणि अन्य देशांतून स्वस्त किमतीतील चण्याची आयात थांबेल आणि त्यामुळे बाजारात किमती स्थिर राहतील. केंद्राने काबुली चण्याच्या आयातीवर ४० टक्के आयात शुल्क लावले आहे. यावर्षी चण्याचे उत्पादन विक्रमी १११ लाख टनावर जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देशांतर्गत भाव कमी होतील, पण आयात शुल्क वाढविल्यामुळे भाव स्थिर राहतील. सन २०१६-१७ मध्ये ९३.५० लाख टन उत्पादन झाले होते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे. आयात शुल्कवाढीचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMarketबाजार