शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता नागपुरात महिलांसाठी दहा समुपदेशन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 20:53 IST

महापालिकेच्या दहा झोनमध्ये गेल्या चार वर्षापासून विनापरवानगी महिला समुपदेशन केंद्र सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. सभागृहात यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे सदस्यीय उपसमिती गठित करून नवीन संस्थांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या समितीने १० संस्थांची शिफारस केली आहे.

ठळक मुद्देमनपाच्या उपसमितीने केली शिफारसवर्षाला ४०.३२ लाखांचा खर्च

आॅनलाईन लोकमतनागपूर: महापालिकेच्या दहा झोनमध्ये गेल्या चार वर्षापासून विनापरवानगी महिला समुपदेशन केंद्र सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. सभागृहात यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे सदस्यीय उपसमिती गठित करून नवीन संस्थांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या समितीने १० संस्थांची शिफारस केली आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.कौटुंबिक वादविवाद सोडविणे व सल्ला देण्यासाठी महापालिकेने २०१२ मध्ये दहा समुपदेशन केंद्र सुरू केले होते. खासगी संस्थांच्या माध्यमातून ही केंद्र चालविली जातात. एका केंद्रावर महापालिका प्रत्येक महिन्याला २८ हजार रुपये खर्च करते़ या केंद्रांनी नियमानुसार, प्रत्येक वर्षी स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. मात्र २०१३ पासून विनापरवानगी ही केंद्र सुरू आहेत. मंजुरी न घेता वर्षाला ४०.३२ लाखांचा खर्च होत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच काही केंद्राबाबत तक्रारीही होत्या. याची दखल घेत स्थायी समितीने यासाठी तीन सदस्यीय उपसमिती गठित केली आहे.नव्याने संस्थांची निवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले़ यात ३२ संस्थांनी अर्ज केले़ यातील १० संस्थांनी विविध अटीशर्तींची पूर्तता केल्यामुळे त्यांना पात्र ठरविण्यात आले आहे़ या संस्थांची शिफारस तीन सदस्यीय उपसमितीने केली आहे़ या संस्थांची निवड एक वर्षासाठी राहणार असून कोणत्याही संस्थेला एकाहून अधिक समुपदेशन केंद्र चालविता येणार नाही. असेही समितीने नमूद केले आहे.अशा आहेत दहा संस्थाउपसमितीने शिफारस केलेल्या संस्थांत ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्था, गुलमोहोर ह्युमन वेलफेअर आॅर्गनायझेशन, जयश्री बहुउद्देशीय शिक्षण संस्था, आधार बहुउद्देशीय संस्था, संतोषी बहुउद्देशीय जनकल्याण संस्था, धम्मदीप बहुउद्देशीय शिक्षण संस्था, शालिनीताई बहुद्देशीय शिक्षण संस्था, परमात्मा एक बहुउद्देशीय शिक्षण संस्था, संकेत खादी ग्रामोद्योग बहुउद्देशीय संस्था, कल्पना बहुउद्देशीय महिला मंडळ आदींचा यात समावेश आहे.११.३३ कोटींचे प्रस्तावशहरातील विविध स्वरूपाचे ११.३३ कोटींचे प्रस्ताव प्रशासनाकडून समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. यात गतकाळात टँकरव्दारे पाणीपुरवठा करणाऱ्या आॅपरेटरला १.३३ कोटींचे बिल देण्याचाही प्रस्ताव आहे. जुने बिल आता सादर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

 

 

टॅग्स :nagpurनागपूर