शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कुख्यात सुमीत ठाकूरला सिनेस्टाईल अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 01:04 IST

Notorious Sumit Thakur Arrested, Crime News उपराजधानीतील कुख्यात गुंड सुमीत ठाकूर याच्या गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी रात्री सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या. या कारवाईमुळे वर्धा मार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देकारचा पाठलाग करून अडवले : गिट्टीखदान पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील कुख्यात गुंड सुमीत ठाकूर याच्या गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी रात्री सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या. या कारवाईमुळे वर्धा मार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला सुमीत ठाकूर नागपुरातील टॉप-१० कुख्यात गुन्हेगारांपैकी एक मानला जातो. त्याची गुन्हेगारांची एक मोठी टोळी असून, त्यात अनेक कुख्यात गुंड आहेत. सुमीतविरुद्ध गेल्या वर्षी मकोकाची कारवाई करण्यात आली होती. त्यात त्याने न्यायालयातून जामिन मिळवला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर सुमीतचा जामिन रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. जामिन रद्द झाल्यापासून चार महिन्यांपासून सुमीत पोलिसांशी लपंडाव खेळत होता. तो आज वर्धा मार्गाने येणार असल्याची माहिती एनपीसी मनजीत ठाकूर यांना मिळाली. त्यांनी ती वरिष्ठांना सांगितली. त्यानुसार, पोलीस उपायुक्त विनीता साहू, गिट्टीखदानचे ठाणेदार सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार अनिल त्रीपाठी, एनपीसी मनजितसिंग ठाकूर, बलजीत ठाकूर, वैभव, नीलेश इंगोले यांनी शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास सुमीत ठाकूरचा पाठलाग सुरू केला. पोलीस मागे लागल्याचे लक्षात आल्यामुळे सुमीत त्याच्या स्कोडा कारने (एमएच ४०/ एन ९०५५) वेगात वर्धा मार्गाने निघाला. मात्र, पोलीस पथकाने जीवाची बाजी लावत त्याचा पाठलाग करून गुरुमीत ढाब्याजवळ त्याच्या मागेपुढे आपल्या दुचाक्या लावून त्याला सिनेस्टाईल थांबवले. दरम्यान, काही तरी गडबड झाल्याचे लक्षात आल्याने घटनास्थळ परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुमीतला ताब्यात घेऊन गिट्टीखदान ठाण्यात नेण्यात आले. वृत्तलिहिस्तोवर त्याची पोलीस चौकशी करीत होते.साथीदार पळालेसुमीतचे साथीदार दुस-या एका कारमध्ये त्याच्या सोबत होते. पोलिसांनी ढाब्याजवळ त्याला ताब्यात घेताच त्याच्या साथीदार दुस-या एका कारमदून वेगात पळून गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक