शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कुख्यात गुन्हेगार रोशन महातो जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:44 IST

हत्या आणि हत्येचा प्रयत्न करून लुटमार केल्याच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गुंड रोशन सुभाष कामकर ऊर्फ महातो (वय २२, न्यू कैलासनगर अजनी) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर गिट्टीखदान पोलिसांनी यश मिळवले.

ठळक मुद्देतीन वर्षांपासून होता फरार : गिट्टीखदान पोलिसांनी बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हत्या आणि हत्येचा प्रयत्न करून लुटमार केल्याच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गुंड रोशन सुभाष कामकर ऊर्फ महातो (वय २२, न्यू कैलासनगर अजनी) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर गिट्टीखदान पोलिसांनी यश मिळवले.२६ जून २०१५ ला दुपारी आरोपी रोशन आणि त्याच्या १२ साथीदारांनी गिट्टीखदानमधील मोहित मार्टिन पीटर (वय २३, रा. मार्टिननगर) याच्या कार्यालयात शिरून त्याची निर्घृण हत्या केली होती. तर, मार्टिनचा सहकारी निखिल मायकल फ्रान्सिस (वय १८, रा. मानकापूर) याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात आरोपींनी मार्टिनच्या तसेच निखिलच्या अंगावरचे सर्व सोनेही लुटून नेले होते. त्यातील रोशन वगळता सर्व आरोपींना अटक झाली होती तर रोशन तीन वर्षांपासून पोलिसांना चुकवत होता. न्यायालयातून पकड वॉरंट निघताच गिट्टीखदानचे ठाणेदार विनोद चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने रोशनच्या अटकेसाठी प्रयत्न केले. अखेर तो त्याच्या घरी आल्याचे कळताच गुरुवारी रोशन कामकर ऊर्फ महातो याच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. पोलीस उपायुक्त चिन्मय, सहायक पोलीस आयुक्त मराठे आणि गिट्टीखदानचे ठाणेदार विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जॉन, हवालदार अनिल गेडाम, चुन्नीलाल धुर्वे आणि सुनील नंदेश्वर यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक