नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी अधिसूचना जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:03 PM2020-11-04T23:03:18+5:302020-11-04T23:05:17+5:30

Graduate Constituency Notification issued, Nagpur News नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जारी केला आहे. १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकारी व विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी जारी केली आहे.

Notification issued for Nagpur Division Graduate Constituency | नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी अधिसूचना जारी

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी अधिसूचना जारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जारी केला आहे. १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकारी व विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी जारी केली आहे.

१२ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल व १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ५ या कालावधीत मतदान होणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल व ७ डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सहाही जिल्ह्यातील जिल्हा कार्यालये, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगर पंचायती व इतर शासकीय कार्यालयांत अधिसूचना दर्शनी भागात लावण्याचे निर्देश डॉ. कुमार यांनी दिले आहेत.

Web Title: Notification issued for Nagpur Division Graduate Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.