शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

संप दडपण्यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना नोटीस; जि.प.तील पदाधिकारी संपकर्त्यांच्या पाठिशी

By गणेश हुड | Updated: March 15, 2023 21:32 IST

प्रशासनाने संपातील सहभागी कर्मचाऱ्यांना २४ तासात स्पष्टीकरण द्या अशा आशयाच्या नोटीस बजावली आहे.

नागपूर: कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना रद्द करून  जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, जिल्हा नागपूर यांच्या नेतृत्वात विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे  महापालिका व जिल्हा परिषदेतील कामकाज विस्कळीत झाले आहे. यामुळे प्रशासनाने संपातील सहभागी कर्मचाऱ्यांना २४ तासात स्पष्टीकरण द्या अशा आशयाच्या नोटीस बजावली आहे. संप दडपण्यासाठी प्रशासनाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे.

जिल्हा परिषद मुख्यालयापुढे कर्मचाऱ्यांच्या धरणे मंडपाला जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, कृषि व पशुसंवर्धन सभापती प्रवीण जोध, शिक्षण व अर्थ समिती सभापती राजकुमार कुसुंबे, समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे, महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, जि.प. सदस्य संजय जगताप, प्रकाश खापरे, शंकर दडमल भेट देवून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. प्रशासनाने नोटीस बजालेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही याची ग्वाही दिली. 

आंदोलन प्रसंगी कर्मचाऱ्यांनी "एकच मिशन जुनी पेन्शन" चा नारा बुलंद केला व परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे नेतृत्व संजय सिंग, डॉ. सोहन चवरे, संजय धोटे,  अरविंद अंतूरकर, सुदाम पांगुळ, विजय बुरेवार,  गोपीचंद कातुरे,अरविंद मदने,मिथीलेश देशमुख, संजय तांबडे, सुजित अढाऊ, संतोष जगताप, भास्कर झोडे, किशोर भिवगडे, सुभाष पडोळे, जयंत दंढारे, योगेश राठोड, निरंजन पाटील, उमेश जायेभाये, योगेश हरडे, चिंधबा दाढे, संगीता चंद्रिकापुरे, रंजना कांबळे, अलका खंते  आदी कर्मचारी नेत्यांचा सहभाग होता.मनपा कर्मचाऱ्यांनो नोटीसला घाबरु नका

महापालिका प्रशासनाने संपात सहभागी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. वास्तविक राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी शासनाला संपाची रितसर नोटीस दिली आहे. तसेच  राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाॉईज असोसिएशन (इंटक) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला संपाबाबत आधिच् नोटीस बजावली आहे. त्यामुळे नोटीसला घाबरू नका,  असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी हा संप असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरPensionनिवृत्ती वेतनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार