शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीच्या शिकार प्रकरणात नऊ अधिकाऱ्यांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 03:42 IST

स्पष्टीकरण सादर करण्याचे दिले निर्देश

लाेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनपरिक्षेत्रात अवनी (टी-१) वाघिणीला ठार मारण्यात आल्यानंतर खासगी शूटर असगरअली खान यांना बक्षीस देण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंवर्धक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांच्यासह एकूण नऊ अधिकाऱ्यांना अवमानना नोटीस बजावून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले.प्रकरणावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वातील न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. अवनी वाघिणीने १३ महिला-पुरुषांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सप्टेंबर-२०१८मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अवनीला ठार मारण्याची परवानगी दिली होती. अवनीला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यास या परवानगीनुसार कृती करायची होती. तसेच अवनीला ठार मारणाऱ्या व्यक्तीस बक्षीस देण्यास मनाई करण्यात आली होती. असे असताना वनाधिकाऱ्यांनी अवनीला ठार मारण्यात आल्यानंतर जंगी कार्यक्रम आयोजित करून खासगी शूटर असगरअली खान यांना वाघिणीची चांदीची मूर्ती भेट दिली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाली, असा आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल अवमानना याचिकेत करण्यात आला आहे. संशोधक संगीता डोगरा यांनी ही याचिका दाखल केली आहे.अवनी नरभक्षक नव्हतीअवनीने १३ महिला-पुरुषांची शिकार केल्याचा आरोप निराधार आहे. ती नरभक्षक नव्हती हे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होते, असा दावा डोगरा यांनी न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने शवविच्छेदन अहवालावरून हे कसे कळू शकते, अशी विचारणा केली. त्याच्या उत्तरात डोगरा यांनी, नरभक्षक प्राण्यांच्या पोटात किंवा आतड्यांमध्ये सहा महिन्यापर्यंत मनुष्यांचे केस, नखे व दात आढळून येतात, अशी माहिती दिली. तसेच, अवनीच्या पोटात केवळ प्राण्याचे केस आढळले. मानवी अवशेष मिळाले नाही असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना यासंदर्भात प्रमाणित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीण