शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  ९०० भूखंडधारकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 22:28 IST

नागपूर महानगर प्रदेश विकास योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. या भागाचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी महानगर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या क्षेत्रातील गावांच्या गावठाणाबाहेर वा नगरपालिका क्षेत्राबाहेर अनुमती न घेता बांधकाम करणाऱ्या ९०० भूखंडधारकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महानगर अपर आयुक्त सुधाकर कुळमेथे यांनी दिली.

ठळक मुद्देमहानगर प्रदेश विकास योजना : भूखंड नियमितीकरणाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर महानगर प्रदेश विकास योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. या भागाचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी महानगर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या क्षेत्रातील गावांच्या गावठाणाबाहेर वा नगरपालिका क्षेत्राबाहेर अनुमती न घेता बांधकाम करणाऱ्या ९०० भूखंडधारकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महानगर अपर आयुक्त सुधाकर कुळमेथे यांनी दिली.महानगर क्षेत्रातील भूखंडांचे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम करताना ग्रामपंचायत तसेच गावठाणाबाहेर बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची मंजुरी घेणे आवश्यक होते. परंतु गावठाणालगत मंजुरी न घेता मोठ्या प्रमाणात बांधकाम के ल्याचे निदर्शनास आले आहे. अशा भूखंडधारकांना नियमितीकरणासाठी नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या नियमानुसार बांधकाम करताना सक्षम अधिकाऱ्यांची अनुमती घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेता बांधकाम के ले असल्यास विकास शुल्क जमा करून नियमितीकरणाची प्रक्रिया राबविली जात आहे. विकास योजनेमुळे महानगर क्षेत्रातील सुमारे पाच लाख मध्यमवर्गीय व गरीब जनतेचा फायदा होणार आहे. याचा विचार करूनच हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यात गावठाण हे ग्रामपंचायतकडेच राहणार असून नगरपंचायतींचे क्षेत्र वगळण्यात आले आहे.प्रस्तावित विकास योजनेत नऊ शहरी केंद्र निर्माण करण्यात आले असून मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार चटई क्षेत्र अनुज्ञेय असेल. योजनेत गावठाणालगतचा रहिवासी वापर सरसकट रद्द करण्यात आला आहे. नऊ अर्बन सेंटरच्या बाहेरील क्षेत्रातील ज्या गावाची लोकसंख्या ५ हजारापेक्षा कमी असेल तर ७५० मीटर व ५ हजारापेक्षा जास्त असेल तर १ हजार मीटर अंतरापर्यंत वार्षिक मूल्य दराच्या १५ टक्के अधिमूल्य आकारून रहिवासी वापरास मंजुरी घेणे आवश्यक आहे.नियमितीकरण क रून गैरसोय टाळावीगावठाणाबाहेर अनुमती न घेता बांधकाम केलेल्या भूखंडधारकांनी  एनएमआरडीएकडे आवश्यक शुल्क जमा करून भूखंडाचे नियमितीकरण करून गैरसोय टाळावी, असे आवाहन महानगर अपर आयुक्तांनी केले आहे.

टॅग्स :Nagpur Muncipal Planning Development Authorityनागपूर महानगर नियोजन विकास प्राधिकरणnagpurनागपूर