शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा भवनातील १२० कर्मचाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:47 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागातील १२० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून नादुरुस्त असलेल्या ‘बायोमेट्रिक मशीन’ला दुरुस्त करण्याची मागणी करणे त्यांना भोवले आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी त्यांना नोटीस जारी केली आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारादेखील देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : ‘बायोमेट्रिक मशीन’ची समस्या सांगणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागातील १२० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून नादुरुस्त असलेल्या ‘बायोमेट्रिक मशीन’ला दुरुस्त करण्याची मागणी करणे त्यांना भोवले आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी त्यांना नोटीस जारी केली आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारादेखील देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये ‘बायोमेट्रिक मशीन’ नादुरुस्त अवस्थेत आहेत. याची माहिती डॉ.खटी यांच्यासमवेत इतर अधिकाऱ्यांनादेखील आहे. याअगोदरदेखील यासंदर्भात तक्रारी झाल्या होत्या. मात्र समस्येला दूर करण्याऐवजी डॉ.खटी यांनी आपल्या कक्षाजवळ एक रजिस्टर ठेवले. ज्या कर्मचाऱ्यांनी ‘बायोमेट्रिक’मध्ये हजेरी लावली नाही, त्यांनी रजिस्टरमध्ये हस्ताक्षर करावे, असे सांगण्यात आले. परंतु हस्ताक्षर केल्यानंतरदेखील अनेक कर्मचाऱ्यांना अनुपस्थित दाखविण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी परत तक्रार केली तर त्यांना नोटीस देण्यात आली. यासंदर्भात डॉ.नीरज खटी यांना संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.शीतयुद्धाचा फटकासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसतो आहे. विभागातील विधीसभेतील एक सदस्य असलेल्या राजेंद्र पाठक यांनी ‘बायोमेट्रिक’च्या दुरुस्तीसंदर्भात कर्मचाऱ्यांकडून हस्ताक्षर घेतले व ते निवेदन डॉ.खटी यांना दिले. यानंतर गोपनीय शाखेचे सहायक उपकुलसचिव मोतीराम तडस यांनी डॉ.खटी यांचा कक्ष गाठला व त्यांच्यात काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर डॉ.खटी यांनी निवेदनावर हस्ताक्षर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली. आपली समस्या त्यांनी विभागप्रमुखाच्या माध्यमातून का पाठविली नाही, असे त्यात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात पाठक यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.कर्मचारी नाराजदरम्यान, डॉ.खटी यांच्या या भूमिकेमुळे कर्मचारी नाराज झाले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. डॉ.खटी गेल्या काही काळापासून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरexamपरीक्षा