शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

नागपुरात  'नोटा' झाला 'मोठा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 22:27 IST

उपराजधानीतील निवडणुकीबाबत यंदा मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारीदेखील ३.८० टक्क्यांनी खालावली. परंतु ‘नोटा’ची संख्या मात्र वाढल्याचे दिसून आले.

ठळक मुद्दे१५ हजारांहून अधिक मतदारांनी उमेदवारांना नाकारले राजकीय पक्षांना करावे लागणार आत्मचिंतन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील निवडणुकीबाबत यंदा मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारीदेखील ३.८० टक्क्यांनी खालावली. परंतु ‘नोटा’ची संख्या मात्र वाढल्याचे दिसून आले. सहाही विधानसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांना मतदारांनी अक्षरश: नाकारल्याचे चित्र दिसून आले. ‘नोटा’च्या संख्येत मागील वेळच्या तुलनेत वाढ झाली असून यामुळे राजकीय पक्षांसमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. नागपुरात थोडेथोडके नव्हे तर १६ हजारांहून अधिक उमेदवारांनी ‘नोटा’चा वापर केला.निवडणुकीतील उमेदवारांबाबत अनेकांना नेहमीच आक्षेप असतो. एकही उमेदवार चांगला नाही, अशी ओरड करून मतदान न करण्याचे समर्थन करीत असतात. निवडणूक आयोगाने यंदादेखील मतदारांसाठी ‘नोटा’चा पर्याय दिला. यामध्ये निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारापैकी एकाही उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर अशा मतदारांना ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये सर्वात शेवटी ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. हजारो मतदारांनी याचा वापर केला. एकूण मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला व राजकीय पक्षांनी चांगले व सक्षम उमेदवार द्यावे असा एकाप्रकारे आग्रहच धरला.२०१४ मध्ये शहरात ६ हजार १४८ जणांनी ‘नोटा’चे बटण दाबले होते.शहरातून सर्वात जास्त पूर्व नागपुरातून ३,४६० मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला. तर यंदा हाच आकडा १६ हजार ७२९ इतका राहिला. या वर्षी ‘नोटा’ वापरण्याचे प्रमाण दीडपटीने वाढले. ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ या संघटनेने आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन केले होते. यानंतर ‘नोटा’ पर्याय वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.सर्वाधिक ‘नोटा’ पश्चिम नागपुरातशहरातील सहाही मतदारसंघातील सर्वाधिक ‘नोटा’चा उपयोग पश्चिम नागपुरात झाला. तेथे ३ हजार ७१७ मतदारांनी ‘नोटा’चे बटन दाबले. तर पुर्व नागपुरात ३ हजार ४६० मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात ३ हजार ६४ मतदारांनी ‘नोटा’चा उपयोग केला.वर्षनिहाय ‘नोटा’ची संख्यामतदारसंघ                          २०१९                २०१४दक्षिण-पश्चिम नागपूर           ३०६४               १०१४दक्षिण नागपूर                      २३५३              १२७६पश्चिम नागपूर                       ३७१७             ११४३मध्य नागपूर                         २१४९               ९३०उत्तर नागपूर                        ११८६              ७३४पूर्व नागपूर                           ३४६०             १०५१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान