शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांशी नव्हे, आपची आघाडी १३० कोटी जनतेशी; केजरीवालांनी धुडकावली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 11:40 IST

केजरीवाल यांनी ‘लोकमत’च्या मंचावर मांडला विकासाचा अजेंडा

लाेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी जिंकण्यासाठी किंवा कुणाला पराभूत करण्यासाठी आघाडी करणार नाही. आमचे ध्येय देशाचा विजय हे असून त्यासाठी आमची आघाडी देशातील १३० कोटी जनतेशी आहे, असे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राजकीय आघाडीची चर्चा धुडकावून लावली.

‘लोकमत’ नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या मालिकेत रविवारी केजरीवाल यांनी ‘आम आदमी पार्टी व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका’ या विषयावर मत मांडले. रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार राघव चड्ढा, ‘लोकमत एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य  विजय दर्डा, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ‘लोकमत’चे संचालक (परिचालन) अशोक जैन, ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्रा, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने आणि ‘लोकमत टाइम्स’चे संपादक एन. के. नायक उपस्थित होते. विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले, तर देवेंद्र दर्डा यांनी आभार मानले.

अरविंद केजरीवाल म्हणाले...nदेशातील एक मोठा पक्ष आजकाल गुंडांना सदस्य बनवत आहे. बलात्काऱ्यांची मिरवणूक काढण्यात येत असून त्यांचे सत्कार सुरू आहेत.  ज्यांना भ्रष्टाचार, गुंडागर्दी हवी आहे त्यांनी त्यांच्यासोबत जावे. ज्यांना विकास, प्रामाणिकपणा व देशभक्ती हवी आहे, त्यांनी आमच्यासोबत यावे. nमाझा देवावर पुरेसा विश्वास आहे.  भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनावा. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मला देवाने मरण देऊ नये. नेत्यांना मोफत उपचार, मोफत विजेची सुविधा आहे, परंतु जनतेला मोफत उपचार, मोफत वीज, मोफत शिक्षण दिले तर विरोधक प्रश्न विचारतात. 

दंगली घडवता येत नाहीत...मी किंवा माझे सहकारी सत्तेसाठी राजकारणात उतरलेलो नाही. आम्हाला भ्रष्टाचार करणे, दंगली घडवून आणणे या गोष्टी येतच नाहीत. राजकारणही जमत नाही.  आम्हाला फक्त जनतेची कामे करता येतात, शाळा-इस्पितळे बांधता येतात.     - अरविंत केजरीवाल

लोकशाहीवर मोकळेपणाने चर्चा व्हावी : विजय दर्डालोकशाहीवर आजवर मोकळेपणे चर्चा झालेली नाही. पक्षांना सत्ता ही राजकारणासाठी हवी असते, की लोककल्याणासाठी हे जनतेला जाणून घेण्यात स्वारस्य असते. त्यामुळे लोकशाहीवर मोकळेपणाने चर्चा व्हावी, अशी अपेक्षा लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. 

पंजाब भ्रष्टाचार व नशामुक्त करणारपंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘नव्या पंजाबसमोरील आव्हाने’ या विषयावर आपली भूमिका मांडली. भ्रष्टाचार ही पंजाबमधील सर्वांत मोठी समस्या आहे. आम्ही ‘अँटी करप्शन हेल्पलाइन’ सुरू केली आहे. जर कुणी सरकारी अधिकाऱ्याने लाच मागितली तर जनतेने त्याचा व्हिडिओ पाठवावा व त्यावर कारवाई होईल, अशी ती यंत्रणा आहे. यामुळे अनेकांना वचक बसला असून सरकारी अधिकाऱ्यांनी ‘लाच देणे पाप आहे’ असे फलकच कार्यालयात लावल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप