शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ घोषणा नाही, सन्मानित जागा द्यावा; पीरिपाचे जयदीप कवाडे यांचा महायुतीला इशारा

By आनंद डेकाटे | Updated: June 1, 2025 21:04 IST

रविभवनमध्ये आयोजित पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते

नागपूर - आंबेडकरी जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी केवळ घोषणा पुरेशा नाहीत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीने पीरिपाला सन्मानित व निर्णायक जागा द्यावा. तरच राज्यातील आंबेडकरवादी जनतेचा विश्वास टिकेल, अन्यथा ही चळवळ उभ्या राजकीय यंत्रणेला प्रश्न विचारू शकते, असा इशारा पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे यांनी महायुतीला दिला.

रविभवनमध्ये आयोजित पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी जवळ येत असताना, संघटनात्मक बळकटी, प्रचार योजना आणि आंबेडकरी समाजाशी संवाद वाढविणे या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

निधी संकलनासाठी संवाद सत्रबैठकीत संघटनात्मक विस्तार, युवकांचा सक्रिय सहभाग, गावपातळीवर जनजागृती मोहिमा, “संविधान घराघरात” ही कल्पना, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि युवा प्रशिक्षण शिबिरे यावरही चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता संपर्क यात्रा, सोशल मीडियावर हॅशटॅगच्या माध्यमातून जनप्रबोधन यावर चर्चा करण्यात आली. तसेच निधी संकलनासाठी ‘उद्योगपती संवाद सत्रे’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी पीरिपाच्या महिला आघाडीच्या नेत्या प्रतिमाताई जयदीप कवाडे, प्रदेश संघटक कपिल लिंगायत, शहर अध्यक्ष कैलाश बोम्बले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, राष्ट्रीय मजदूर सेना विदर्भ प्रदेशाध्यक्ष विजय पाटील, पूर्व विदर्भ महिला अध्यक्षा सुचिताताई कोटांगळे, हाजी अब्दुल आरीफ, विदर्भ प्रदेश संघटक अंकित धुपे, नागपूर ग्रामीण अध्यक्ष पलाश ठवरे, महाराष्ट्र ब्रिगेड सेना सुमित डोंगरे, नितीन गायकवाड, पूर्व विदर्भ महासचिव डैनी शामकुवर, नागपूर शहर उपाध्यक्ष शेख नाझिर, निलेश डुंबरे, अनंत पुरी, सुनील कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Mahayutiमहायुती