शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कुंडली नव्हे, रिपोर्टने जुळणार ‘रेशीमगाठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:37 IST

विवाह अर्थातच विश्वासाचे नाते. परंतु जोडीदारातील एकाला दुर्धर आजार जडल्यास संसाराची राखरांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात.

ठळक मुद्देतास ग्रामपंचायतने घेतला ठराव : विवाहपूर्व एचआयव्ही, सिकलसेल तपासणी

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कभिवापूर : विवाह अर्थातच विश्वासाचे नाते. परंतु जोडीदारातील एकाला दुर्धर आजार जडल्यास संसाराची राखरांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. आजार लपवून विवाहानंतर त्याचा खुलासा झाल्यास पवित्र नात्यात कटुता निर्माण होते आणि कुटुंबीयांवर मोठा आघात होतो. अशा प्रसंगाची दखल म्हणून सुमारे १५०० लोकसंख्येच्या तास गटग्रामपंचायतने महत्त्वपूर्ण ठराव घेतला आहे. गावातील तरुण-तरुणी जन्म पत्रिका पाहून विवाह बंधनात न अडकता, एचआयव्ही, सिकलसेल तपासणीचे रिपोर्ट कार्ड बघितल्यानंतर रेशीमगाठी जुळणार आहे. ग्रामपंचायतच्या या आगळ्यावेगळ्या ठरावाच्या संकल्पपूर्तीसाठी तास येथील महिलांनी निर्धार केला आहे.गटग्रामपंचायत तास व सह्याद्री संस्था नागपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून ११ आॅक्टोबरला असंख्य गावकºयांच्या उपस्थितीत ‘विवाहपूर्व एचआयव्ही, एड्स व सिकलसेल चाचणी’चा ठराव घेण्यात आला. या गटग्रामपंचायत अंतर्गत मोखाळा गावाचाही समावेश आहे. १५ आॅगस्ट या स्वातंत्र्यदिनी व गांधी जयंतीला झालेल्या ग्रामसभेत सदर विषय ठेवण्यात आला होता. हा ठराव सर्वानुमते पारित झाल्यानंतर त्याची गावात १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी प्रारंभी सह्याद्री संस्था, ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील तरुणांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.दरम्यान, ११ आॅक्टोबरला ग्रामपंचायतमध्ये झालेल्या एका सभेत ‘आधी एचआयव्ही, एड्स व सिकलसेलची चाचणी आणि त्यानंतर लग्न’ असा संकल्प ग्रामस्थांनी केला आणि तास गावामध्ये नव्या आदर्शाच्या पाऊलखुणा उमटण्यास सुरुवात झाली. यावेळी सरपंच युवराज शंभरकर, उपसरपंच वर्षा ढोणे, ग्रामविकास अधिकारी ए.डी. गजघाटे, विभागीय पर्यवेक्षक रुपाली सदावर्ती, जिल्हा साधन व्यक्ती नंदू सातपुते, ग्रामीण रुग्णालयाचे एचआयव्ही समुपदेशक ओमप्रकाश पोटभरे, सारिका मेश्राम, संगीता मेश्राम आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांना एचआयव्ही, एड्स व सिकलसेलबाबत सखोल माहिती देऊन ठरावाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय सदर ठरावाची प्रत शासनाच्या एड्स नियंत्रण संस्था मुंबई व नागपूर जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाला पाठविण्यात आली.सह्याद्रीतर्फे गौरवसह्याद्री संस्थेने यासाठी प्रयत्न केले असले तरी याबाबतचा ठराव पारित करणे व त्यांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतने घेतलेला पुढाकार व त्यास ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद हा मोलाचा आहे. हा ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायतने एकमताने पारित केल्याबद्दल सह्याद्रीतर्फे ग्रामपंचायत पदाधिकाºयांचा सत्कार यावेळी करण्यात आला.कौटुंबिक कलह थांबतीलअशा प्रकाराचा ऐतिहासिक ठराव घेणारी तास गटग्रामपंचायत पहिलीच ठरली आहे. एचआयव्हीमुळे विवाहानंतर हातावरील मेहंदी निघण्यापूर्वीच संसाराची राखरांगोळी होते. यामध्ये जोडीदारापैकी कुणीही जबाबदार असू शकतो. त्यामुळे तळहातावरील रेषा बघून, जन्म पत्रिका बघितल्यानंतर विवाह बंधनात अडकण्यापेक्षा एचआयव्ही, एड्स, सिकलसेल तपासणीचे रिपोर्ट कार्ड बघून विवाहाच्या रेशीमगाठी जुळल्यास कौटुंबिक कलह थांबतील, अशा प्रतिक्रिया सरपंच युवराज शंभरकर, उपसरपंच वर्षा ढोणे, ग्रामसेवक ए. डी. गजघाटे, एचआयव्ही समुपदेशक ओमप्रकाश पोटभरे यांनी व्यक्त केल्या.