शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हतबल नव्हे मजबुत पंतप्रधान हवा : भुपेंद्र यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:13 IST

भारतीय जनता पार्टीच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला भाजपाचे महासचिव भुपेंद्र यादव यांनी २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपाला यश मिळणार असल्याचा दावा केला. देशाला हतबल नाही तर मजबुत पंतप्रधान हवा असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देकॉंग्रेसला भ्रष्टाचाराची जननी असल्याचे सुतोवाच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय जनता पार्टीच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला भाजपाचे महासचिव भुपेंद्र यादव यांनी २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपाला यश मिळणार असल्याचा दावा केला. देशाला हतबल नाही तर मजबुत पंतप्रधान हवा असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.अधिवेशनाच्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत भुपेंद्र यादव बोलत होते. ते म्हणाले, भाजपा मोदी सरकारने केलेली कामे घेऊन नागरिकांमध्ये जाणार आहे. मोदींच्या आधी युपीएच्या काळातील पंतप्रधान हतबल होते. ते केवळ एका परिवाराच्या हिताकडे लक्ष ठेवत होते. परंतु मोदी देशातील जनतेला परिवार समजून काम करीत आहेत. कॉंग्रेसवर हल्ला करताना ते म्हणाले, कॉंग्रेस भ्रष्टाचाराची जननी आहे. बँकात ५२ लाख कोटींच्या कर्ज खात्यांचे एनपीए होणे त्यांचीच देन आहे. या बाबत कायदा करण्याची मागणी मोदी शासनाने २०१६ मध्ये पूर्ण केली. त्याच्या बळावर नीरव मोदी आणि विजय माल्ल्यासारख्या लोकांवर पाश आवळले जात आहेत. ते म्हणाले, कॉंग्रेस केवळ खोटे बोलते. राफेल विमानाच्या सौद्यावरही कॉंग्रेस खोटे बोलत आहे. सुप्रिम कोर्टाने कोणतीच गडबड झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. कॉंग्रेस संविधानिक संस्थांना विरोध दर्शवून लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नसल्याचे स्पष्ट करीत आहे. त्यांचे राज्य सीबीआयचे अधिकार क्षेत्र हिसकावून घेत आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीवर कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी कॉंग्रेसशी निगडीत वकील या मुद्याला सुप्रिम कोर्टात अडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.महाआघाडीत कोण राहतील माहित नाहीयादव यांनी भाजपाच्या विरोधात होत असलेली महाआघाडी तथ्यहिन असल्याचे सांगत त्यात कोण-कोणासोबत आहे याची माहितीच होत नसल्याचे सांगतले. ते म्हणाले, केरळात कॉंग्रेस डाव्या आघाडी विरोधात लढते, परंतु बंगालमध्ये त्यांच्यासोबत आघाडी करते. उत्तर प्रदेशात सपा-बसपाने कॉंग्रेसला बाहेर केले आहे. त्यांच्याकडे कोणतेच नेतृत्व नाही. ते मजबुत शासन देऊ शकत नाहीत.शिवसेना वैचारिक सहकारीमहाराष्ट्रात शिवसेनेशी युतीबाबत सुरु असलेल्या चर्चेबाबत विचारले असता ते म्हणाले की, शिवसेना भाजपाचा जुना सहकारी आहे. आमच्यात वैचारिक एकता आहे. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएत लहान-मोठे ३५ पक्ष सोबत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण