शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

उत्तर भारताची थंडी विदर्भालाही गारठवणार, शेवटच्या आठवड्यात अधिक हुडहुडी

By निशांत वानखेडे | Updated: December 18, 2023 18:53 IST

यावर्षीचे शेवटचे दिवस बाेचणाऱ्या गारठ्यात जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नागपूर : उत्तर भारतात सध्या प्रचंड थंडीची लाट पसरली आहे. पारा ४ ते ८ अंशावर घसरला असून बर्फासह धुक्याची चादर पसरली आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहून नेण्यासाठी अनुकूल असलेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या मध्य प्रदेश व महाराष्ट्रावर अस्तित्वात येत आहे. त्यामुळे यावर्षीचे शेवटचे दिवस बाेचणाऱ्या गारठ्यात जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

या अंदाजानुसार विदर्भातील संपूर्ण ११ व खान्देशातील ३ जिल्ह्यासह नाशिक नगर छ.संभाजीनगर, जालना, बीड नांदेड हिंगोली परभणी अश्या महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात दिवसा-रात्रीच्या थंडीतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भातील पहाटेचे किमान तापमान हे १० ते १२ डिग्री सेल्सियस किंवा त्याखाली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात किमान तापमान सरासरी १२ ते १४ अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यात कमाल तापमानही सरासरीच्या खाली जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशाबरोबर जोरदार ईशान्य थंड वारे महाराष्ट्राच्या भू-भागावर ओढले जाण्याची शक्यतेमुळे कडाक्याच्या थंडीचा प्रभाव या भागात जाणवणार आहे. मात्र यावर्षी हिवाळी हंगामात शीत- लहरींची संख्याही दरवर्षीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.दरम्यान साेमवारी नागपूरसह विदर्भात सर्वत्र कमाल व किमान तापमानात अंशत: घसरण झाली. नागपुरात रात्रीचा पारा १२.८ अंशावर गेला. कमाल पारासुद्धा सरासरीच्या २ अंशाने खाली २६.८ अंशावर आहे. १२ अंश किमान तापमानासह गडचिराेली सर्वात थंड तर गाेंदियामध्ये पारा १२.५ अंशावर हाेता. इतर जिल्ह्यात रात्रीचे तापमान १३ अंशाच्यावर म्हणजे सरासरीत आहे. नागपुरात सकाळी आकाशात ढगांची गर्दी जमली हाेती, ज्यामुळे सूर्याचे दर्शन नागरिकांना थाेडे उशीराच झाले. आकाशात ढग व खाली थंड वातावरणामुळे लाेकांना हुडहुडी भरली हाेती. त्यामुळे कधी सूर्य निघताे, याची प्रतीक्षा लागली हाेती. त्यानंतर दिवसभर तुरळक ढगांची हजेरी हाेती. सायंकाळी तापमान पुन्हा घसरले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ