शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विना अनुदानित शिक्षकांचा मोर्चा दुसऱ्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:44 IST

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने विधानभवनावर काढलेला मोर्चा आपल्या मागण्यांसाठी अडला होता. मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्वासनावर समाधान न झाल्यामुळे मोर्चेकरी ठाण मांडून बसले होते. रात्रभर मुक्कामी थांबलेला हा मोर्चा बुधवारीही अडून होता. मोर्चाची मुदत संपल्यामुळे मोर्चा मागे घेण्याची सूचना पोलिसांनी बुधवारी सायंकाळी केली. परंतु शिक्षणमंत्री विधानसभेत घोषणा करीत नाहीत, तोवर मोर्चा मागे घेणार नसल्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतल्यामुळे, हा मोर्चा सलग दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होता.

ठळक मुद्देशिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करण्याची मागणी

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने विधानभवनावर काढलेला मोर्चा आपल्या मागण्यांसाठी अडला होता. मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्वासनावर समाधान न झाल्यामुळे मोर्चेकरी ठाण मांडून बसले होते. रात्रभर मुक्कामी थांबलेला हा मोर्चा बुधवारीही अडून होता. मोर्चाची मुदत संपल्यामुळे मोर्चा मागे घेण्याची सूचना पोलिसांनी बुधवारी सायंकाळी केली. परंतु शिक्षणमंत्री विधानसभेत घोषणा करीत नाहीत, तोवर मोर्चा मागे घेणार नसल्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतल्यामुळे, हा मोर्चा सलग दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होता.२० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने मंगळवारी विधानभवनावर मोर्चा काढला होता. मोर्चातील शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. शिक्षणमंत्र्यांनी मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. परंतु जोपर्यंत शिक्षण मंत्री विधानसभेत याबाबत घोषणा करीत नाहीत तोपर्यंत मोर्चा मागे घेणार नसल्याचा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतल्यामुळे, मंगळवारी रात्रभर मोर्चेकरी मॉरिस टी-पॉर्इंटवर तळ ठोकून बसले होते. बुधवारी दिवसभर हा मोर्चा तेथेच ठाण मांडून बसला होता. दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चात सहभागी शिक्षकांसाठी भोजनाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोर्चास्थळी केली होती. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना मुदत संपल्यामुळे मोर्चा मागे घेण्यास सांगितले. परंतु मागण्या मान्य होईपर्यंत मोर्चा मागे घेणार नसल्याची भूमिका घेऊन मोर्चेकरी बुधवारी रात्री उशिरापर्यंत जागेवरच ठाण मांडून बसले होते.

टॅग्स :Teacherशिक्षकMorchaमोर्चा