शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेची चिंता नाही, शाळा बंद झाल्याने काळजी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 10:30 IST

Nagpur News कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, प्रशासनाने ७ मार्चपर्यंत शाळा बंद केल्या. शाळा, ज्युनिअर कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक लागली होती. आता शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल? याची चिंता पालकांना सतावत आहे.

ठळक मुद्देदहावी, बारावीच्या पालकांनी व्यक्त केली खंत

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दहावी आणि बारावीची परीक्षा एप्रिल महिन्यात ऑफलाईन होणार आहे. कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. नोव्हेंबरमध्ये कशातरी शाळा सुरू झाल्या. पण कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, प्रशासनाने ७ मार्चपर्यंत शाळा बंद केल्या. शाळा, ज्युनिअर कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक लागली होती. आता शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल? याची चिंता पालकांना सतावत आहे.

कोरोना संक्रमणात परीक्षेचे नियोजन बोर्डासाठी डोकेदुखी ठरणार आहे. ऑफलाईन परीक्षा असल्याने पालकांनाही परीक्षा देण्यासाठी पाठविण्याबाबत काहीसी भीती आहे. पण या भीतीपेक्षा शाळा बंद झाल्याने पालक पुन्हा चिंतेत आहे. नागपूर जिल्ह्यातील काही पालकांशी यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी बोर्डाची आहे. कोरोना असल्याने बोर्ड त्या दृष्टीकोनातून सुरक्षात्मक उपाययोजना करणारच आहे. पालक म्हणून आम्हीसुद्धा विद्यार्थ्यांना योग्य सुरक्षात्मक उपाययोजना करूनच पाठविणार आहोत. पण खरा प्रश्न आहे, की शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी अभ्यास करायला लागले होते. सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी होणार होती. किमान त्या माध्यमातून परीक्षेची तयारी होणार होती. मात्र, शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक तुटणार आहे. कोरोनाचे संकट पुढे किती दिवस राहाते, शाळा पुन्हा सुरू होतील की नाही, हा प्रश्न आहे.

- माझी मुलगी दहावीची परीक्षा देणार आहे. परीक्षा ऑफलाईनच व्हायला पाहिजे. त्यामुळे मुलांचे योग्य मूल्यांकन व त्याला गुणवत्ता सिद्ध करता येईल. बोर्ड करेल ना सुरक्षात्मक नियोजन.

राजेश भागवतकर, पालक

- परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची बोर्ड घेईल ना काळजी. पण, खरी काळजी आता शाळा ज्या बंद झाल्यात ना, त्याची आहे. मुले कशीतरी अभ्यासाला लागली होती. शालेय परीक्षेच्या माध्यमातून त्यांची उजळणी होणार होती. शाळा बंद झाल्याने पुन्हा विद्यार्थ्यांची लिंक तुटेल.

दिलीप आडे, पालक

- प्रशासनाने केवळ दहावी व बारावीचे वर्गच सुरू करायला हवे होते. उगाच पाचव्या वर्गापासून शाळा सुरू केली. त्यामुळे शाळेत गर्दी झाली आणि विद्यार्थी संक्रमित झाले. परिणामी शाळा बंद कराव्या लागल्या. पण, शाळा बंद केल्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होणार आहे. सर्वच मुलांकडे ऑनलाईनची साधने नाहीत आणि विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्यानेही घेत नाहीत. शाळा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी होत होती.

- रिना चवरे, पालक

- कोरोनाच्या भीतीमुळे मुलांना वर्षभर शाळेत पाठविले नाही. परंतु परीक्षेसाठी त्यांना शाळेत पाठवून अनेक विद्यार्थ्यांच्या संपर्कात येऊ देणे म्हणजे एकप्रकारे कोरोनाला निमंत्रण देणे होय. मुलांमध्ये भीती असल्याने ते परीक्षेत एकाग्रपणे राहून पेपर सोडवू शकणार नाहीत. यासाठी परीक्षा ऑनलाईन घेणेच संयुक्तिक आहे.

बाळा आगलावे, पालक

- दहावी आणि बारावीच्या मुलांना कोरोना कळतोय. खबरदारी घ्यावी हेसुद्धा त्यांना माहिती आहे. शाळा सुरू झाल्यानंतर मुले खबरदारी घेतच होती. शाळांनीही मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली होती. शिक्षण चांगले सुरू होते. मुलेही परीक्षेच्या तयारीत व्यस्त झाली होती. त्यामुळे दहावी आणि बारावीचे वर्ग किमान बंद करायला नको होते.

रामचंद्र उमाठे, पालक

- विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झाला नाही. शाळेत कसातरी अभ्यासक्रम पूर्ण झाला असता, सराव परीक्षेच्या माध्यमातून त्यांचा सराव झाला असता. अभ्यासक्रमच पूर्ण होणार नाही, तर परीक्षा कशी देणार, याची काळजी आहे.

विलास कांबळे, पालक

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस