शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

वेतन मिळाले नाही, घरांमधून कचरा उचल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:27 IST

शहरातील कचरा संकलनासाठी दोन कंपन्यांच्या नियुक्तीला जेमतेम दीड महिना होत नाही तोच कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना दीड महिना लोटूनही वेतन न मिळाल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले.

ठळक मुद्देस्वच्छता कर्मचाऱ्यांचा असहकार, मुख्यालयात प्रदर्शन : कचरा संकलन व्यवस्था कोलमडली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील कचरा संकलनासाठी दोन कंपन्यांच्या नियुक्तीला जेमतेम दीड महिना होत नाही तोच कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना दीड महिना लोटूनही वेतन न मिळाल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. कचरा उचल थांबविल्याने शहरात स्वच्छता व्यवस्था कोलमडली असून परिणामी शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र निर्माण झाले.शहरातील अव्यवस्था बघता आंदोलनकारी कर्मचाऱ्यांना १५ दिवसाचे वेतन देण्यात आले. मात्र न्यूनतम वेतनश्रेणीच्या आधारे वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा असंतोष अधिकच भडकला. त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयात जाऊन प्रदर्शन केले. कर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन सोपविले. आयुक्तांनी नियमानुसार वेतन जारी करण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाºयांनी मुख्यालयासमोर जोरदार प्रदर्शन केले. सोबतच कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर हुकूमशाहीचे वर्तन करण्याचा आरोप करीत शनिवारी कामबंद आंदोलनाची घोषणा केली. दोन्ही कंपन्यांचे अधिकारी कर्मचाऱ्यांशी अव्यवहार करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. एका भागात काम करीत असताना हजेरी लावण्यासाठी दुसऱ्या भागात जावे लागते. पावसामुळे काही मिनिटे उशीर झाला तरी कर्मचाऱ्यांना परत पाठविण्यात येत असल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या.विशेष म्हणजे दीड महिन्याअगोदरच शहरातील कचरा संकलन अधिक सक्षम करण्यासाठी दहा झोनला दोन भागात विभागून दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. यानुसार झोन १ ते ५ पर्यंतचे कंत्राट ए.जी. एन्वायरोला तर झोन क्रमांक ६ ते १० पर्यंतचे काम बीव्हीजी कंपनीला देण्यात आले. काम मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कचरा उचल न झाल्याने अव्यवस्था निर्माण झाली होती. ही स्थिती सामान्य होण्यासाठी १५ दिवस लोटले. यादरम्यान दोन्ही कंपन्यांवर एक-एक लाख रुपये दंडही लावण्यात आला होता. वेतन कमी मिळालेशुक्रवारी सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करताच दोन्ही कंपन्यांचे अधिकारी सक्रिय झाले. यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात १५ दिवसाचे वेतन जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बीव्हीजी कंपनीच्या ९५० पैकी ६३५ कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा करण्यात आले. दुसरीकडे ए.जी. एन्वायरोच्या १००० पैकी ६०० कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा करण्यात आल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार कामगारांना ६७८ रुपये तर वाहन चालकांना ९५५ रुपये देण्याचा करार झाला होता. मात्र जे वेतन खात्यांमध्ये जमा करण्यात आले ते कामगारांना ४०० रुपये तर वाहन चालकांना प्रतिदिन ६०० रुपये वेतन देण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी एवढ्या कमी वेतनामध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न