शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
2
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
3
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
4
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
5
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
6
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
7
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
8
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
9
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
10
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
11
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
12
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
13
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
14
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
15
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
16
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
17
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
18
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
19
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
20
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?

नो व्हॅक्सिन, नो स्कूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:08 AM

पालकांचा शाळा सुरू करण्यास विरोध, विद्यार्थांची जबाबदारी कोण घेणार? नागपूर : राज्य सरकारने २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८च्या ...

पालकांचा शाळा सुरू करण्यास विरोध, विद्यार्थांची जबाबदारी कोण घेणार?

नागपूर : राज्य सरकारने २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८च्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा नागपुरातील पालकांच्या संघटनेने विरोध केला आहे. जोपर्यंत कोरोनाचे व्हॅक्सिनेशन पूर्ण होत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करू नये, अशी पालकांची मागणी आहे. राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेने यासंदर्भात शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मुख्यमंत्री सचिवालयाला निवेदन देऊन शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. संघटनेने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, या माध्यमातून शाळांचा पालकांकडून शुल्क वसुलीचा फंडा आहे. शाळा पालकांकडून संमतीपत्र घेऊन पालकांवरच जबाबदारी ढकलत आहे. संघटनेचे म्हणणे आहे? की, मुलांना शाळेत कोरोनाचा धोका होणार नाही, झाल्यास त्या मुलाच्या खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च शाळा स्वत: भरेल, असे संमतीपत्र शाळांनी सुद्धा पालकांना द्यावे. एकीकडे कॉलेज अजूनही सुरु झालेले नाही, तर शाळा का सुरू करण्यात येत आहे? असाही सवाल संघटनेने केला आहे. बुधवारी संघटनेच्या नेतृत्वात शहरातील भवन्स, सेंटर पॉईंट, स्पीक अ‍ॅण्ड स्पॅन, संस्कार विद्यासागर, नारायणा, सेंट पलोटी, स्कूल ऑफ स्कॉलर आदी शाळांमधील पालक सहभागी झाले होते. संघटनेचे संयोजक योगेश पाथरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी कैलास चौधरी, तृप्ती देशपांडे, धनंजय चौधरी, मदन कोहळे, विशाल डोईफोडे, ईश्वर कोल्हे आदी उपस्थित होते.