शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

नागपुरात आता सकाळी ११ नंतर वीज जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:55 IST

शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळाभर सकाळी ११ च्या पूर्वी केले जाणार आहे. महावितरणने हिट अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला असून सकाळी ११ वाजतानंतर आता ‘नो शटडाऊन’ म्हणजेच वीज जाणार नाही.

ठळक मुद्देदुपारी ‘नो शटडाऊन’ : महावितरणने जारी केला‘हिट अ‍ॅक्शन प्लान’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळाभर सकाळी ११ च्या पूर्वी केले जाणार आहे. महावितरणने हिट अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला असून सकाळी ११ वाजतानंतर आता ‘नो शटडाऊन’ म्हणजेच वीज जाणार नाही.मान्सूनपूर्व तयारीच्या कामात महावितरणने गती पकडली आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावयाची याशिवाय नियमित देखभाल व दुरुस्ती सोबतच महामेट्रोच्या अत्यावश्यक कामांसाठी वेगवेगळ्या भागातील वीजपुरवठा रीतसर पूर्वसूचना देऊन काही वेळेपुरता स्थगित केला जात आहे. अनेकदा दुपारभर ही कामे चालत असल्याने संबंधित भागाचा वीजपुरवठा काही तासांसाठी बंद केल्या जातो, मात्र मागील काही दिवसांपासून नागपुरात अंग पोळून काढणारे तापमान बघता देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ११ वाजताच्या पुढे वीजपुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणच्या काँग्रेसनगर विभागाने घेतला आहे. यामुळे देखभाल व दुरुस्तीच्या सर्व कामांकरिता नागपुरातील महावितरणच्या ग्राहकांना पूर्वसूचना देऊन सकाळी ११ पूर्वीच वीजपुरवठा बंद केला जाणार आहे.मागील काही दिवसांपासून नागपूरकरांना प्रचंड उन्हाळ्याला सामोरे जावे लागत आहे. पाऱ्याने सातत्याने चाळीशी ओलांडली आहे. अशावेळी देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद केल्याने ग्राहकांना प्रचंड मन:स्ताप होतो, सोबतच देखभाल व दुरुस्तीच्या कामावरील कर्मचाऱ्यांनाही कडक उन्हाचा त्रास होतो, हे लक्षात घेता किमान उन्हाळ्यात तरी वीज ग्राहकांना यात दिलासा मिळावा याकरिता महावितरणच्या शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके आणि काँग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी हा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. प्रचंड उष्णता व विजेचा वाढीव भार यामुळे वीज वितरण यंत्रणेत एखादा तांत्रिक दोष निर्माण झाल्यास दुपारीही वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. हा बिघाड त्वरित दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करेपर्यत ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे तसेच खंडित वीजपुरवठा किंवा विजेसंबंधी तक्रारीसाठी १९१२ किंवा १८००२३३३४३५अथवा १८००१०२३४३५या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन