शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

ना लाज, ना भीती; रामगिरी-वॉकर स्ट्रीटवर चालतात कपल्सचे चाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 13:26 IST

संध्याकाळ होताच, स्थिती आणखीनच बिकट झालेली दिसून येते.

- सुरभी शिरपूरकर

नागपूर : शहरातील काही रस्ते आता डोळे उघडे ठेऊन चालण्यासारखे राहिलेले नाहीत. कधीकाळी झुडपाआड प्रेमचाळे करणारे कपल्स आता चक्क रस्त्याच्या कडेला बसून निर्लज्जपणे चाळे करत असतात. हे बेताल आणि किळसवाणे वर्तन सर्रास चालत असूनही याची दखल कुणी घेत नसल्याने समाजमन चिंतित आहे.

पोलीस जिमखाना, पोलीस आयुक्तालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या भागात सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था असल्याने परिसर सर्वाधिक सुरक्षित असतो, अशी सर्वांची धारणा असली तरी नेमके याच परिसरात असे प्रकार सर्रास घडतात, ही वस्तूस्थिती आहे. लेडीज क्लब गार्डन ते सेमिनरी हिल्स-जपानी गार्डनकडे जाणाऱ्या या सिव्हिल लाईन्स परिसरात अनेक जोडपे दिवसाढवळ्या अश्लील कृत्य करताना आढळून येतात. संध्याकाळ होताच, स्थिती आणखीनच बिकट झालेली दिसून येते.

‘लोकमत’ने घेतलेल्या आढाव्यात ही बाब स्पष्ट झाली. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास आमच्या प्रतिनिधीने टेहळणी केली असता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘रामगिरी’, पोलीस जिमखाना, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अनेक शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या या रामगिरी-वॉकर स्ट्रीटवर बरीच जोडपी अश्लील चाळे करताना आढळले. विशेष म्हणजे, याच परिसरात असलेल्या ग्रीन जिमवर लहान मुलांसोबत त्यांचे पालकही व्यायाम करण्यासाठी येत असतात. वॉकर स्ट्रीट असल्यामुळे या रस्त्यावर सकाळी व संध्याकाळच्या सुमारास वॉकिंग व रनिंगसाठी अनेक नागरिक येत असतात. या सर्वांसमोरच ही जोडपी आपल्या भावनांना मोकळीक देत असल्याचे निदर्शनास येत असते.

येथूनच तेलंगखेडी उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीपी क्लबही आहे. हा रस्ता संध्याकाळच्या सुमारास अतिशय अंधारलेला आणि नीरव शांतता असलेला असतो. अंधार पडताच, या रस्त्यावर अनेक जोडपी मर्यादा ओलांडत असल्याचेही दिसून येते. अनेक टवाळखोर अशा कपल्सचा गैरफायदाही घेत असल्याचे दिसून येते. मात्र, स्वत:च गैरकृत्य करत असल्याने तक्रारी करण्याचे टाळले जाते. याकडे ना प्रशासनाचे ना पोलिसांचे लक्ष आहे. या भागात येणाऱ्या नागरिकांना नाइलाजाने हे सगळे कृत्य बघण्याशिवाय पर्याय नसतो.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर