शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई शाळांमधील महिला शिक्षकांना ना धड वेतन, ना सामाजिक सुरक्षा; सिस्वाचे राष्ट्रपतींना पत्र

By निशांत वानखेडे | Updated: August 23, 2023 17:28 IST

सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापण्याची मागणी

नागपूर : सीबीएसई शाळांमध्ये सेवा देणाऱ्या महिलाशिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाेषणाचा सामना करावा लागताे. या महिला शिक्षकांना ना धड वेतन मिळत, ना सामाजिक, आराेग्यविषयक सुविधा. हा गैरप्रकर नियंत्रित करण्यासाठी सरकारने सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी सीबीएसई स्कूल्स स्टाफ वेलफेअर असोसिएशन (सिस्वा) ने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहुन केली आहे.

सिस्वाच्या अध्यक्ष दीपाली डबली यांनी सांगितले, भारतातील एकुण २८ हजार ८८६ सीबीएसई शाळांमध्ये लाखो शिक्षक कार्यरत असून त्यात ९५ टक्के महिला शिक्षकांचा समावेश आहे. या महिला शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात व्यावसायिकदृष्ट्या शोषण होत असून योग्य वेतन न देणे, बेकायदेशीररित्या निलंबन, बडतर्फी, पदोन्नती, आरोग्यविषयक सुविधा, प्रसुती रजा, अपॉइंटमेंट लेटर, सीबीएसई कायद्यानुसार निवृत्तीचे ६० वर्ष वय, सर्व्हीस बुक आदींबाबत त्यांच्यावर शाळा व्यवस्थापनाकडून सातत्याने अन्याय व मानसिक छळ केला जात आहे.

खासगी शाळांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असून त्यामाध्यमातून पैशांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते आहे. असे असताना सुद्धा सीबीएसई शाळा व्यवस्थापनाकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक शोषण केले जात आहे, असा आराेप डबली यांनी केला. या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता महिला शिक्षकांकडे कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नाही.सिस्वाद्वारे गेल्या सहा वर्षापासून सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. पीएमओ ऑफीस, मनुष्यबळ विकास मंत्रालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री यांना पत्र पाठवण्यात आले आहे. यासाेबत सिस्वाचे संस्थापक अॅड. संजय काशीकर यांच्या मार्गदर्शनात कार्यकारिणी सदस्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्याबाबत साकडे घातले आहे. प्राधिकरण स्थापन करून महिला शिक्षकांचे शाेषण थांबवावे, अशी मागणी राष्ट्रपतींना केली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूWomenमहिला