शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यापासून वेतन नाही : नागपूर मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:13 IST

महापालिकेत मागील काही वर्षांत कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. परिणामी जवळपास चार हजार पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटी क र्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने गेल्या दोन महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. दिवाळीच्या महिन्यातही वेतन मिळण्याची शाश्वती नसल्याने, या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमनपा कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत मागील काही वर्षांत कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. परिणामी जवळपास चार हजार पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटी क र्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने गेल्या दोन महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. दिवाळीच्या महिन्यातही वेतन मिळण्याची शाश्वती नसल्याने, या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.महापालिकेत सुरक्षा रक्षक, संगणक आॅपरेटर, पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे चालक, बस कंडक्टर यांच्यासह विविध विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांनी कामावर ठेवलेले आहे. आर्थिक कंत्राटदारांचे तंगीमुळे बिल थकल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यात वेतन दिलेले नाही. यामुळे कंत्राटी कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना दिवाळीपूर्वी वेतन न मिळाल्यास त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.कर्मचारी संघटनेचा संपाचा इशारामहापालिका कर्मचारी, सफाई कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व ऐवजदार सफाई कामगारांच्या आर्थिक व अन्य ज्वलंत मागण्यांसाठी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. परंतु आजवर आश्वासनाशिवाय काही मिळालेले नाही. न्याय्य मागण्यांसाठी संप पुकारण्याची तयारी संघटनेने सुरू केली आहे. संपाबाबत कर्मचाऱ्यांची सहमती घेतली जात आहे. याला ३,७१७ कर्मचाऱ्यांनी लेखी सहमती दर्शविलेली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडण्याला कर्मचारी जबाबदार नाहीत. आजवर जेव्हा जेव्हा कर्मचारी आंदोलन करतात तेव्हा तेव्हा त्यांना आर्थिक कारण सांगितले जाते. असे किती दिवस चालणार, असा सवाल कर्मचारी संघटनेने केला आहे.संपात ऐवजदारही सहभागी होणारमहापालिकेतील  कर्मचाऱ्यांच्या संभाव्य संपात सहभागी होण्यास मोठ्या संख्येने सफाई कर्मचाऱ्यांनी इच्छा दर्शविली आहे. झोनस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे ऐवजदारांत प्रचंड असंतोष आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होण्याला सहमती दर्शविली आहे.ऐवजदारांचा शुक्रवारी मोर्चामहापालिकेतील ऐवजदार सफाई कामगार व अन्य कंत्राटी कामगार शुक्रवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून न्याय मिळत नसल्याने हा मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती नागपूर महानगरपालिका ऐवजदार कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी