शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सासरे नको; हवा राजाराणीचा संसार; पत्नीला पोटगी देण्यास खंडपीठाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 08:35 IST

प्रकरणातील दाम्पत्य नागपूरचे असून, त्यांचे १८ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले. लग्नानंतर पती व सासू-सासऱ्याने बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सासू-सासरे सोबत नको म्हणणाऱ्या आणि पतीला केवळ राजा-राणीचा संसार करण्यासाठी बाध्य करू पाहणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही चपराक बसली. कुटुंब न्यायालयानंतर उच्च न्यायालयाने तिला पोटगीसाठी अपात्र ठरविले. न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.

प्रकरणातील दाम्पत्य नागपूरचे असून, त्यांचे १८ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले. लग्नानंतर पती व सासू-सासऱ्याने बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. पत्नी महानुभाव पंथाची अनुयायी आहे. तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. त्यामुळे पती व सासू-सासरे छळ करीत होते. त्यांनी तिला घराबााहेर काढल्याने ती माहेरी निघून गेली, असा आरोप केला गेला होता; परंतु आरोप सिद्ध झाले नाहीत.

पत्नीने कुटुंब न्यायालयात दिलेल्या जबाबावरून, तिची पतीविरुद्ध तक्रार नाही, हे दिसून आले; तिला सासू-सासरे नको आहेत. तिला केवळ पतीसोबत राहायचे आहे, हे आढळले. २०१० मध्ये पत्नी माहेरी गेली होती. ती पतीसोबत परतली. छळ झाला असता, तर तिने सासरी येण्याचा निर्णय घेतला नसता, याकडे निर्णय देताना लक्ष वेधण्यात आले. पत्नी आठवड्यातून तीन दिवस महानुभावपंथीय मंदिरात जात होती. त्यावरून तिला मंदिरात जाण्याची मुभा होती, हे स्पष्ट झाले.

...म्हणून पोटगी नाहीnपत्नी कोणत्याही ठोस कारणांशिवाय पतीपासून वेगळी झाली आहे. पतीने तिला सासरी परत आणण्याचे प्रयत्न केले; पण तिने प्रतिसाद दिला नाही. पतीने स्वत:हून पत्नीची देखभाल करणे टाळले नाही. त्यामुळे तिला पोटगी दिली जाऊ शकत नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. nकुटुंब न्यायालयाने ९ मे २०१४ रोजी पत्नीची मासिक पाच हजार रुपये पोटगीची मागणी नामंजूर केली होती. त्यामुळे तिने न्यायालयात धाव घेतली. 

टॅग्स :Divorceघटस्फोट