शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चालले तरी काय, आठवड्याभरात दुसऱ्या पोलीस ठाण्याला बॉम्बने उडविण्याची धमकी

By योगेश पांडे | Updated: August 9, 2023 15:05 IST

मागील आठवड्यात सिताबर्डी पोलीस ठाण्यातदेखील अशाच प्रकारे फोन  करण्यात आला होता

नागपूर : एका व्यक्तीने चक्क नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या इमारतीला बॉम्बने उडविण्यात येणार असल्याचा फोन केला व त्यामुळे खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे मागील आठवड्यात सिताबर्डी पोलीस ठाण्यातदेखील असाच प्रकार झाला होता. शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचे मोठमोठे दावे पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असले तरी पोलिसांबाबतच धाक उरला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोमवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्ष डायल ११२ येथे अज्ञात व्यक्तीचा फोन आला व नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या इमारत बॉम्बने उडविण्यात येणार असल्याची धमकी दिली. याची माहिती बीट मार्शल अभिजीत राऊत यांना देण्यात आली. यामुळे खळबळ उडाली व पोलीस ठाण्याची सखोल तपासणी करण्यात आली. पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून फोन कुठून आला होता याची माहिती काढली.

बसस्थानक परिसरातील एका दुकानासमोरून मुकेश मुन्नालाल बागडे (४७, गणेश ले आऊट) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला विचारणा करण्यात आली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने ११२ क्रमांकावर फोन करून धमकी दिल्याचे कबूल केले. जनतेमध्ये भिती निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस ठाण्याला उडविण्याची धमकी दिल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मागील आठवड्यात सिताबर्डी पोलीस ठाण्यातदेखील अशाच प्रकारे फोन  करण्यात आला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर