शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

आरएसएसने कितीही प्रयत्न केले तरी राज्यात सत्ता परिवर्तन होणार

By कमलेश वानखेडे | Updated: September 4, 2024 17:37 IST

विजय वडेट्टीवार यांचा दावा : २० ते २५ वर्ष भाजपचा मुख्यमंत्री नाही

कमलेश वानखेडे, नागपूरनागपूर : राज्यातील जनता भाजपला कंटाळली आहे. महाराष्ट्रातील राजकरण एकमेका विरोधात नव्हते. वैयक्तिक विरोधात बोलण्याचे काम महाराष्ट्रात झाले. बहुजन समाज भाजपला कंटाळला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कितीही प्रयत्न केले तरी राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. पुढील २० ते २५ वर्ष तरी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आता उपमुख्यमंत्री अजित पवार आहे लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून प्रोजेक्ट होत आहेत. ही श्रेय वादाची लढाई आहे. निवडणुकीच्या तोंडावर आहेत. यांना बहिणीचे प्रेम ओळखून आहे. हा दृष्ट भाऊ आहे. हा रक्षण करू शकत नाही. दोन चार महिन्यात पैसे देऊन मत मिळतील या भ्रमात राहु नये, असा टोला त्यांनी लगावला.

आरटीओमधील बदल्यांवर वडेट्टीवार म्हणाले, सगळ्या बदल्या राजकीय पैशाच्या भरवश्यावर होत आहेत. बोली लावली जात आहे. अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. सत्ताधारी आमदार पोलिसांची गाडी साफ करून घेतो तर पोलिसांची मानसिकता काय शिल्लक राहिली असेल. लवकर सत्तेत या नाहीतर हे लोक महाराष्ट्र खड्ड्यात घालतील असे अनेक अधिकारी आम्हाला खाजगीत सांगत आहेत, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांची ताकद रावसाहेब दानवे यांना कळली. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे पक्ष फोडायचे. त्यात दुसऱ्यांदा साथ द्यायची. दुसऱ्यांची पाळी आली की त्यांचा पक्ष फोडायचा चिन्ह पळवायचे हे पाप जे करत आहे. त्याचे कर्म भोगावे लागतील, असा चिमटाही त्यांनी घेतला.

एसटीच्या संपकारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा शब्द दिला होता. सदावर्तेच्या माध्यमातून सामावून घेऊ म्हणाले होते. पण ते झाले नाही. काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. पडळकर जर एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असेल तर त्यांची भूमिका बदललेली आहे. त्यांच्या वाट्याचा वाटेकरी दुसरा झाल्याने ते परेशान झाले आहेत. पडळकर सध्या सरकारच्या विरोधी भूमिका मांडताना दिसून येत आहेत. सगळं आलबेल आहे असं म्हणता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर