शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन नाही, म्हणून घर नाही! खापरीतील बेघरांची घरकुलासाठी प्रतीक्षा अखंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:53 IST

Nagpur : दोन वर्षांपासून घराची वाट बघणाऱ्या खापरीतील गरजूंचं प्रशासनाला साकडं

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारच्या ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत हजारो पात्र बेघर लोकांकडे जमीन नसल्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही. 'पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना' असूनही शासन व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे खापरी परिसरातील बेघर नागरिक दोन वर्षापासून घराच्या आशेवर थांबले आहेत.

भूमिहीनांना घरकुल योजनेचा लाभमिळावा, यासाठी शासनातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजना, शासकीय जमीन विनामूल्य देण्याची योजना व अतिक्रमण नियमितीकरण योजना राबविली जाते. पण, प्रत्यक्षात एकाही योजनेतून लाभार्थ्यांना जमीन मिळत नसल्याचे वास्तव आहे. कोराडी येथे राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शहर विकास मंचच्या शिष्टमंडळाने अनिल वासनिक व युवराज फुलझेले यांच्या नेतृत्वात भेट घेऊन खापरी परिसरातील बेघरांनी निवेदन सादर करून तत्काळ जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शिष्टमंडळात पदाधिकाऱ्यांसह पात्र अर्जधारक सहभागी होते.

"ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनाच लाभ?"असे असूनही, प्रशासन फक्त जमीनधारक लाभार्थ्यांनाच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देत आहेत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बेघरांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत.

कामठी तालुक्यातील बेघर वंचित!कामठी तालुक्यातील खापरी ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी यादी सादर केली गेली, तरीही जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र ठरूनही जमिनीअभावी घरकुल मिळाले नसल्याची माहिती शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरgovernment schemeसरकारी योजना