शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग परसला नाही : मनपा आयुक्तांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:33 IST

क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्थापनाचा अभाव आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतच्या आरोपात तथ्य नाही,असा दावा करताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, सात्विक जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. स्वच्छता राखली जात आहे. क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग पसरत असल्याचे वारंवार होत असलेले आरोप चुकीचे आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊन शिथिल झाल्यास जनतेला नियम पाळावे लागतील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्थापनाचा अभाव आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतच्या आरोपात तथ्य नाही,असा दावा करताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, सात्विक जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. स्वच्छता राखली जात आहे. क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग पसरत असल्याचे वारंवार होत असलेले आरोप चुकीचे आहेत.कारण रविनगर केंद्रातील एका खोलीतील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता तर दुसरी व्यक्ती निगेटिव्ह होती. अशा परिस्थितीत, केंद्रामुळे संसर्ग वाढत आहे असे म्हणता येणार नाही.आयुक्तांनी फेसबुक लाईव्हमधून शहरातील नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. लॉकडाऊन शिथिल झाल्यास जनतेला नियम पाळावे लागतील, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. शारीरिक अंतर पाळण्याची जबाबदारी दुकानदार आणि आस्थापना प्रमुखांची असेल. मास्क वापरणे बंधनकारक राहील.आयुक्त म्हणाले, असे आढळून आले आहे की, जेव्हा एखादा गंभीर रुग्ण खासगी रुग्णालयात येतो तेव्हा त्याला कोविड-१९ चा रिपोर्ट संदर्भात विचारणा केली जाते किंवा नमुने घेतले जातात. संबंधित रुग्णाला त्वरित उपचाराची गरज आहे म्हणून त्यावर तातडीने उपचार करा. अहवालाची वाट पाहू नका. मार्गदर्शक सूचना देखील असेच सांगते.मानपा रुग्णालयांच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. नागपूरात आलो तेव्हा परिस्थिती चांगली नव्हती. परंतु आता ४०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ती कॉपोर्रेट हॉस्पिटलपेक्षा कमी नाही. ते म्हणाले की कोविड -१९ ची सध्या जी परिस्थिती नागपुरात आहे, याचे श्रेय संपूर्ण टीमला आहे. झालेल्या चुका किंवा अपयश यासाठी मी आयुक्त म्हणून जबाबदार आहे.प्रसिद्धीसाठी काम करत नाहीआयुक्त म्हणाले की, सरकारच्या दिशानिर्देशांचे पालन करून लोकांचे कल्याण करावयाचे आहे. मी नियम व कायद्याच्या कक्षेत राहून अधिक चांगले काम करतो. मी ग्राउंड लेव्हलवर काम करतो. प्रसिध्दीसाठी कधीही काम केले नाही. कोविडचा संसर्ग वाढताच सतरंजीपुरा, मोमीनपुरा येथे जाऊन उघडी दुकाने बंद केली.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्या