शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

होळीत गोंधळ घालणाऱ्यांनो सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:28 IST

शहरात होळी आणि धुळवडीच्या दिवसाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी विशेष खबरदारी घेतली आहे. गोंधळ घालणारे व तळीरामांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. यासोबतच हेल्मेटची कारवाईही सुरू राहील.

ठळक मुद्देनागपुरात पोलिसांचा चोख बंदोबस्तहुल्लडबाज, तळीरामांवर विशेष नजर‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’सह ‘हेल्मेट’ मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात होळी आणि धुळवडीच्या दिवसाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी विशेष खबरदारी घेतली आहे. गोंधळ घालणारे व तळीरामांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. यासोबतच हेल्मेटची कारवाईही सुरू राहील.सुरक्षेसाठी पोलिसांच्या विशेष टीम तयार करण्यात आल्या आहे. याशिवाय दंगल नियंत्रण पथक (आरसीपी) व अतिशिघ्र कृती दलाच्या जवानांनाही (क्युआरटी) २४ तास अलर्ट राहण्यास सांगण्यात आले. दिवस व रात्र पाळीसाठी आरसीपी व क्युआरटीचे प्रत्येकी दोन कंपन्या कर्तव्यावर राहतील. याशिवाय ५०० होमगार्डही शहरातील विविध ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. तसेच बॉम्ब शोधक-नाशक पथक, डॉग स्कॉड पथकही सक्रिय असून बंदोबस्तात निर्धारीत जागी फिक्स पॉर्इंट ठरवून दिले आहे. याशिवाय धार्मिक व संवेदनशील ठिकाणी सशस्त्र जवान तैनात करण्यात येणार आहेत.पोलीस सूत्रांनुसार, स्ट्रायकिंग फोर्स'मध्ये एक पथक गुन्हे शाखेचे सुद्धा राहणार आहे. शहरातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिला वसतिगृहांसमोर विशेष पथक सक्रिय राहणार असून या परिसरात पेट्रोलिंग वाढविण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहतूक करणाऱ्या  वाहन चालकांच्या बंदोबस्ताकरिता ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची मोहीम धडकपणे राबविण्यात येणार आहे. ब्रेथ अ‍ॅनालायझर' मधून प्रत्येक संशयित मद्यपीला जावे लागणार आहे. गोंधळ घालणाऱ्या  तळीरामांवर अंकुश लावण्याचीही तयारी करण्यात आली आहे. शहरात जागोजागी बॅरिकेट् लावण्यात येतील. आवश्यकता पडल्यास एसआरपीच्या जवानांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. अशाप्रकारे अंदाजे ४००० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. धुळवडीच्या दिवशी वाहतूक शाखा पोलीस गुरुवारी सकाळी ७ वाजतापासून रस्त्यावर तैनात राहणार आहेत. रहदारीच्या आणि सार्वजनिक रस्त्यावर रंग खेळणारे युवा तसेच भरधाव वाहन चालविणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पॅट्रोलिंग व्हॅन चौकाचौकात राहणार आहेत.होळीत गोंधळ घालणाऱ्यांना सावधानशहरात ७९० होळ्या पेटणारशहरात एकूण ७९० होळ्या पेटणार असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. शहरात पेटत असलेल्या होळ्यांमध्ये परिमंडळ क्रमांक -१ मध्ये एकूण २०४, परिमंडळ क्रमांक -२ मध्ये १०३, परिमंडळ क्रमांक -३ मध्ये १६१, परिमंडळ क्रमांक -४ मध्ये १३३, परिमंडळ क्रमांक - ५ मध्ये १८९ अशा एकूण ७९० होळ्यांचा समावेश आहे.विमानतळावर सतर्कताहोळी दिनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला. विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘सीआयएसएफ’चे जवान डोळ्यात तेल घालून सुरक्षेबाबत सजग असल्याचे सूत्रांनी सांगितले.सराईत गुन्हेगार झाले भूमिगतहोळी व रंगपंचमी शांततेत पार पडावी यासाठी शहर पोलिसांनी बंदोबस्तात गुन्हेगारांसह हुल्लडबाजही रडारवर होते. बुधवारी सायंकाळपासूनच पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ अधिकांºयाच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त लावण्यात आला. शहरातील सराईत गुन्हेगार हे होळीनिमित्त भूमिगत झाले आहेत. रंगांची उधळण करताना अवैध दारूचीही उधळण होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानेही विशेष नजर ठेवली आहे. रंगपंचमीला रक्ताचे गालबोट लागू नये यासाठी सर्वच ठाणेदारांना विशेष खबरदारी घेत असल्याचे निर्दशनास आले तसेच गुन्हे शाखेचे पाच विशेष पथक संपूर्ण शहरात तैनात करण्यात आले.धोकादायक रंग टाळा!रासायनिक रंग किंवा कृत्रिम रंग होळी या सणाचा प्रमुख भाग झाला आहे. होळीत कृत्रिम रंगांमुळे त्वचा, केस व डोळ्यांवर दुष्पपरिणाम होतो. रंगपंचमी खेळताना उत्साहाच्या भरात हानिकारक घातक रंग वापरले जातात. त्यामुळे त्वचेची अ‍ॅलर्जी, खाज सुटणे, त्वचेची साले निघणे, भेगा पडणे असे त्रास होऊ शकतात. होळीचे रंग अधिक गडद असतात. या रंगांचा वापर चेहरा रंगवण्यासाठी होतो. पण हे रंग घातक आहेत. त्यामुळे रंगांची उधळण करणारा हा सण साजरा करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.सतर्कता बाळगाहोळीनंतर डोळ्यांमध्ये त्रास जाणवत असेल, तर कापसाच्या बोळ्यावर गुलाबजल शिंपडून डोळ्यावर काही वेळ ठेवा. यामुळे थकलेल्या डोळ्यांना आराम मिळेल. डोळ्यात रंग गेल्यामुळे जळजळ, सूज, वेदना असेल तर स्वच्छ पाण्याने डोळे धुऊन घ्यावे. यातून आराम न पडल्यास नेत्रतज्ज्ञांना दाखवा. रासायनिक रंगांऐवजी घरी बनवलेल्या रंगांचा वापर करा. रासायनिक रंगापासून वाचण्यासाठी डोळ्यांवर चष्मा लावा. डोळ्यांमध्ये लाल रंग गेल्यास त्वरित पाण्याचा मारा करा. आंघोळ करताना आणि रंग काढताना डोळे बंद ठेवा.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Policeपोलिस