शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क नाही, तर शाळाही नाही आणि ऑनलाईन वर्गही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 01:07 IST

शासनाने आर्थिक मदत द्यावी किंवा पालकांकडून शिक्षण शुल्क घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विना अनुदानित शाळा वेलफेअर असोसिएशन यांनी केली आहे. जर शिक्षण शुल्क मिळत नसेल तर शाळाही नाही आणि ऑनलाईन वर्गही होणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

ठळक मुद्देसीबीएसई शाळांचा इशारा : संस्थाचालक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात सर्वच संस्था आणि कंपन्या यांच्यावर कठीण समय आला आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य शासनाने उद्योजक आणि कंपन्यांना या परिस्थितीतून काढण्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. मात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी काम करणाऱ्या सीबीएसई शाळांना कुठलीही मदत शासनाने जाहीर केली नाही. दुसरीकडे काही संघटना आणि पालकांकडून या शाळांची बदनामी केली जात आहे. शासनाचे कुठलेही अनुदान न घेता चालणाऱ्या या संस्था अतिशय अडचणीत आहेत. अशावेळी एक तर शासनाने आर्थिक मदत द्यावी किंवा पालकांकडून शिक्षण शुल्क घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विना अनुदानित शाळा वेलफेअर असोसिएशन यांनी केली आहे. जर शिक्षण शुल्क मिळत नसेल तर शाळाही नाही आणि ऑनलाईन वर्गही होणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.राज्यात केंद्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत अनेक संस्था सुरू आहेत. या संस्था शासनाच्या कोणत्याही अनुदानाविना सुरू आहेत. या संस्था स्वयं अर्थसाहाय्यित आहे व शासनाची कुठलीही मदत संस्थांना मिळत नसून केवळ, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या भरवशावरच शाळा सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात ज्या प्रमाणे इतर उद्योग ठप्प पडले आहेत, त्याच प्रमाणे शैक्षणिक संस्थाही बंद पडल्या आहेत. मार्च महिन्यात लागलेल्या पहिल्या लॉकडाऊनपूर्वी अनेक पालकांनी शैक्षणिक शुल्क भरले होते. तरीही ५० ते ६० टक्के पालकांकडून शैक्षणिक शुल्क प्राप्त झाले नाही. शाळा बंद झाल्या आणि पालकांनीही शैक्षणिक शुल्क भरण्यास दिरंगाई केली.संस्थाचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षकांच्या वेतनासह शाळा कर्मचारी यांचे वेतन, शाळा व्यवस्थापन कसे करावे, हा प्रश्न उभा ठाकला आहे. काही संस्थाचालकांनी बँकेचे कर्ज घेऊन संस्था उभारल्या आहेत. त्यांचे हप्ते फेडण्याची अडचण सहन करावी लागत आहे. अशात आरटीईचा थकीत असलेला कोट्यवधीचा परतावा शासनाकडून मिळाला नाही. अशा अनेक अडचणींचा सामना संस्थाचालकांना करावा लागत आहे. असे असूनही काही समाजविघातक प्रवृत्तींकडून शाळा नाही तर शुल्क नाही, असे सांगून शाळांची बदनामी केली जात आहे. याला पालक बळी पडत आहेत. शिक्षण विभागातर्फे पालकांकडून फी वसुलीसाठी सक्ती करू नये असे निर्देश देण्यात येत आहे. आम्ही संस्थाचालक शासनाच्या सर्व नियमांचे पालन करतो, मात्र शासनानेही आमच्या संस्थांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. सीबीएसई शाळा आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि उत्तम शैक्षणिक वातावरण पुरवीत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नियुक्ती संस्थांनी केली आहे. शाळेकडून पालकांना बळजबरीने शुल्क भरण्याचे कुठलेही निर्देश संस्थांनी दिलेले नाहीत. थकीत शुल्क सुविधेनुसार भरण्यास सांगण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या परिपत्रकातही शुल्क घेऊ नये असे सांगण्यात आलेले नाही. तरीही सीबीएई संस्थेच्या शाळांविरोधात अफवा पसरविली जात आहे. शासनाने आमच्या अडचणी समजून घ्यावात.राजाभाऊ टांकसाळे, पदाधिकारी, विनाअनुदानित स्कूल वेलफेअर असोसिएशन

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर