शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

सुरक्षिततेसाठी आयुध निर्माणीत 'नो एन्ट्री' : नागरिकांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 20:44 IST

सुरक्षेच्या कारणावरून अंबाझरी आयुध निर्माणीमध्ये बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परिणामी, आयुध निर्माणी परिसरातील शाळा, बँक, गॅस एजन्सी आदींकडे कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सुरक्षेच्या कारणावरून अंबाझरी आयुध निर्माणीमध्ये बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परिणामी, आयुध निर्माणी परिसरातील शाळा, बँक, गॅस एजन्सी आदींकडे कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापूर्वीही अशी बंदी घालण्यात आली होती, हे येथे उल्लेखनीय.आयुध निर्माणी परिसरात रविवारी भरणाऱ्या साप्ताहिक बाजारात जाण्यासाठी अनेक जण गेले होते. परंतु, त्यांना प्रवेशद्वार बंद दिसले. आत जाण्यासाठी प्रवेशद्वार उघडण्याची मागणी केली असता, त्यांना बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना बाजारातील खरेदीशिवायच घरी परतावे लागले. या बंदीमुळे वाडी, दत्तवाडी, लावा व सोनबानगर परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.

प्रवेशद्वारावर नोटीसआयुध निर्माणीच्या सुरक्षा विभागाने प्रवेशद्वारावर प्रवेशबंदीचा नोटीस चिकटवला आहे. सुरक्षा व प्रशासकीय कारणांमुळे आयुध निर्माणी परिसरात बाहेरच्या लोकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे त्यात लिहिले आहे. केवळ परिसरातील क्वॉर्टरमध्ये जाणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे.कारवाईचा इशाराआयुध निर्माणीच्या सुरक्षा व्यवस्थेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

टॅग्स :ORDNANCE FACTORY AMBAJHARIआयुध निर्माणी अंबाझरीnagpurनागपूर