शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

PM मोदींच्या दौऱ्याआधी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; सुरक्षा यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 09:59 IST

सुरक्षा यंत्रणा सतर्क : प्रशासनही सज्ज, उद्घाटनाची तयारी जोरात

आनंद डेकाटे - फहीम खानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबर रोजी होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याची तारीख निश्चित होताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून,  प्रशासनही सज्ज झाले आहे. त्याअंतर्गत समृद्धी महामार्गाचा नागपुरातील ‘एन्ट्री पॉइंट’ बंद करण्यात आला आहे. 

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ‘लोकमत’ने गुरुवारी समृद्धी महामार्गाची ‘ऑन द स्पॉट’ पाहणी केली. नागपुरातील गुमगाव खडका येथून समृद्धी महामार्गाला सुरुवात होते. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी जनावरे किंवा कुणीही महामार्गावर थेट येऊ नये म्हणून टिनपत्र्याचे संरक्षण उभारण्यात आले आहे. महामार्ग सुरू झाल्यावर वाहन चालकांसाठी महामार्गावरील टोल प्लाझावर पेट्रोल पंपाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 

१५ हजार लोकांसाठी डोमची व्यवस्था या कार्यक्रमासाठी १५ हजार लोक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनीसुद्धा गुरुवारी दुपारी अधिकाऱ्यांसोबत लोकार्पण स्थळाची, डोमची पाहणी केली. 

हेलिपॅडची उभारणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समृद्धी महामार्गावर नेमके रस्ता मार्गाने येणार की, हेलिकॉप्टरने याबाबत सध्यातरी संभ्रमच आहे. मात्र, प्रशासन दोन्ही दृष्टीने तयारीत आहे. टोल प्लाझाजवळ महामार्गाला लागून हेलिपॅड उभारण्याचे काम सुरू आहे. यासोबतच ते महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर महामार्गावर काही अंतर वाहनाने फिरणार असल्याचेही सांगितले जाते. 

महिला चालविणार टोल प्लाझासमृद्धीवरील टोल प्लाझाची जबाबदारी सांभाळणाऱ्या फास्ट गो इन्फ्राने येथील टोल प्लाझावरील एक संपूर्ण शिफ्ट महिलांचीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एका शिफ्टमध्ये २० महिला राहतील. महिलांची शिफ्ट ही सकाळी राहील. असे टोल प्लाझाचे सीईओ संताेष पवार यांनी सांगितले.

ठळक वैशिष्ट्ये nनागपूर- शिर्डी समृद्धी महामार्गाचे अंतर ५२० किमीnमहामार्गाची रुंदी १२० मीटर nआठपदरी मार्ग nमहाराष्ट्रातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जातोयnप्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २४ जिल्हे आपसात जुळतीलnनागपूर ते मुंबईपर्यंतचा प्रवास ८ तासांत आणि नागपूर ते शिर्डीपर्यंतचा प्रवास ५ तासांत पूर्ण होण्याचा दावा nमहाराष्ट्र राज्य विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार प्रकल्पावर २५,१६५.३४ कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर याचा एकूण खर्च ५५,३३५.३४ कोटी रुपये आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग