शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांतर्गत एक लाख रुपयापर्यंतच्या मालवाहतुकीवर ई-वे बिल नाही : सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 20:07 IST

महाराष्ट्रात एक लाख रुपयापर्यंत मालवाहतुकीवर ‘ई-वे’ बिल नाही. इतर राज्यांत ई-वे देयकासाठी ५० हजार रुपयापर्यंतच्या पुरवठा मूल्याचा माल, अशी मर्यादा असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात एक लाख रुपयापर्यंत मालवाहतुकीवर ‘ई-वे’ बिल नाही. इतर राज्यांत ई-वे देयकासाठी ५० हजार रुपयापर्यंतच्या पुरवठा मूल्याचा माल, अशी मर्यादा असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.कराचे व्यवस्थित अनुपालन व्हावे, करचुकवेगिरीला आळा बसावा, या उद्देशाने वस्तू आणि सेवाकर कायद्यांतर्गत ई-वे बिलची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यात ई-वे बिल प्रणाली १ एप्रिल २०१८ पासून लागू झाली. त्यानंतर आतापर्यंत ११ कोटी ९२ लाख ५७ हजार ३१५ इतकी ई-वे देयके तयार झाली आहेत. एका जून महिन्यातच ७७ लाख ४१ हजार ४०७ इतकी ई-वे देयके तयार झाली आहेत. ई-वे देयक निर्मितीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी आहे.यात राज्यनिहाय ई-वे देयक देण्याची आवश्यकता नसते. संपूर्ण देशात एकच ई-वे देयक वापरता येते. वेगवेगळ्या तपासणी नाक्यांवर वाहने न थांबविल्यामुळे मालाची वाहतूक मुक्त होऊन वाहतूक व्यवस्था गतिमान झाल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.आंतरराज्य माल वाहतूक करताना देशात सर्वत्र ५० हजार रुपये इतकी ई-वे बिल मर्यादा आहे. राज्यातील लहान व्यापाऱ्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय करणे सोपे जावे, अडचणीचे ठरू नये, यादृष्टीने छोट्या व्यापाऱ्यांसाठी ई-वे बिलची राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठीची मर्यादा एक लाख रुपये इतकी ठेवण्यात आल्याने राज्यातील छोटे व्यापारी, उद्योग-व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.कोणत्याही मूल्याच्या कापसाच्या लडी, सूत, कापड, कपडे यासारखा माल राज्यांतर्गत ५० कि.मी.पर्यंतच्या अंतरावर प्रक्रिया करण्यासाठी पाठविल्यास त्यालाही ई-वे बिलामधून वगळण्यात आले असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtraमहाराष्ट्र