शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादी नव्हे मोगलाई मराठ्यांची युती : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 20:30 IST

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मराठा समाजातील नेत्यांना वर्चस्व हवे आहे. त्यामुळे त्यांच्यातील युती ही दोन पक्षांची नसून दोन जातींची असेल. मोगलाई मराठ्यांची ती युती असून त्याला केवळ पक्षाचे लेबल असेल, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे गुरुवारी केली. एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता रविभवन येथे पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्दे पक्षाचे केवळ लेबल, जातीला अधिक महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मराठा समाजातील नेत्यांना वर्चस्व हवे आहे. त्यामुळे त्यांच्यातील युती ही दोन पक्षांची नसून दोन जातींची असेल. मोगलाई मराठ्यांची ती युती असून त्याला केवळ पक्षाचे लेबल असेल, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे गुरुवारी केली.एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता रविभवन येथे पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस पक्षाला १२ जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नाही. मुळात काँग्रेसच इतर पक्षांना सोबत घेण्याच्या तयारीत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नवीन पर्याय उभा केला आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव मान्य केला नाही तर लोकसभेच्या सर्व जागा लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली माणसे बसविण्यासाठी सीबीआयमध्ये फेरबदलमोदी सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी राफेल मुख्य कारण ठरणार आहे. राफेल हा बोफोर्सपेक्षा मोठा घोटाळा असून हा गुन्हेगारी आणि फसवेगिरी स्वरूपाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेलच्या खरेदीप्रक्रिया संदर्भात तांत्रिक बाबींची माहिती मागितली आहे. सीबीआय महासंचालकांना त्याबाबत नोटीस बजावली होती. त्यामुळे खरेदी प्रक्रियातील बाबी समोर आल्या असत्या. त्या रोखण्यासाठीच मोदी सरकारने फेरबदल करून आपली माणसे बसविली, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण