शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बीएड, एमएड प्रवेश परीक्षेचे विदर्भात केंद्रच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:57 IST

विविध अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सद्यस्थितीत ‘बीएड’, ‘एमएड’ तीन वर्षीय ‘इंटिग्रेटेड’ अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रवेशपरीक्षेचे विदर्भातील एकाही जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने परीक्षेसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरातील केंद्रांवर जावे लागणार आहे.

ठळक मुद्दे‘अभाविप’चा आक्षेप : १० दिवसात दिलासा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सद्यस्थितीत ‘बीएड’, ‘एमएड’ तीन वर्षीय ‘इंटिग्रेटेड’ अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रवेशपरीक्षेचे विदर्भातील एकाही जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने परीक्षेसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरातील केंद्रांवर जावे लागणार आहे.यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतला आहे. परिषदेने नागपूर विभागाच्या सहसंचालक डॉ.अर्चना नेरकर यांना निवेदन देऊन विदर्भात परीक्षा केंद्र देण्याची मागणी केली आहे. या प्रवेश परीक्षेची माहिती ‘महासीईटी’ या ‘पोर्टल’वरुन सार्वजनिक करण्यात आली. परीक्षेच्या माहितीपत्रकात विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी एकाही ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आलेले नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर याच शहरांची नावे नमूद आहे. त्यामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांना याच शहरांमध्ये परीक्षेसाठी जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडदेखील बसणार आहे. बरेच विद्यार्थी तर परीक्षेपासून वंचित राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता दहा दिवसाच्या आत विदर्भात परीक्षा केंद्र द्यावे. अन्यथा अभाविपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपचे महानगर मंत्री वैभव बावनकर यांनी दिला आहे.यासंदर्भात सहसंचालकांनी मुख्यालयात पत्र पाठवून वरील घोळ लक्षात आणून दिला आहे. परीक्षा केंद्र वाढवून देण्यासंदर्भात संचालकांनी विचार करावा, असे यात नमूद आहे.

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा