शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळणार पण थकबाकी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:54 IST

स्थायी समितीने प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करताच सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचारी संघटनांच्या आशेवर पाणी फिरले आहे. कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची थकबाकी मिळणार नाही. १ऑगस्ट २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू केला जाणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे. सातव्या वेतन आयोगामुळे महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाला ११० कोटींचा आर्थिक बोजा वाढणार आहे. सहाव्या वेतन आयोगाची १२० कोटींची थकबाकी देण्याचा प्रशासनाचा मानस नसल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे व सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देऑगस्ट महिन्यापासून लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थायी समितीने प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करताच सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचारी संघटनांच्या आशेवर पाणी फिरले आहे. कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची थकबाकी मिळणार नाही. १ऑगस्ट २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू केला जाणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे. सातव्या वेतन आयोगामुळे महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाला ११० कोटींचा आर्थिक बोजा वाढणार आहे. सहाव्या वेतन आयोगाची १२० कोटींची थकबाकी देण्याचा प्रशासनाचा मानस नसल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे व सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.सहावा वेतन आयोग लागू करतानाच कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एरिअर्स घेणार नसल्याची लेखी हमी दिली होती. त्यामुळे वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. थकबाकी द्यावयाची झाल्यास १२० कोटींचा बोजा पडणार आहे. सातवा वेतन आयोग लांबणीवर पडेल. प्रलंबित महागाई भत्ता दिला जाईल, अशी माहिती जोशी यांनी दिली.सातवा वेतन आयोग १ ऑगस्ट २०१९ पासून लागू होईल. सप्टेंबर २०१९ चे वेतन वाढीव स्वरुपात असेल. १ जानेवारी २०१६ ते ३१ जुलै २०१९ या दरम्यानचे कोणत्याही प्रकारचे एरिअर्स मिळणार नाही.विशेष म्हणजे २५ ऑक्टोबर २०१० पासून मनपा कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू झाला. १ जानेवारी २००६ ते ३० नोव्हेंबर २०१० या दरम्यानचे एरिअर्स थकीत आहे, ते द्यावयाचे झाल्यास महापालिकेवर आर्थिंक बोजा वाढणार असल्याने न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी