शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला हायड्रन्टसाठी कंत्राटदार मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:27 IST

शहरात आगीची घटना घडल्यानंतर होणारी धावपळ टाळण्यासाठी व वेळीच आग आटोक्यात यावी यासाठी अग्निशमन विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ११६ हायड्रन्ट लावण्याचे प्रस्तावित आहे. परंतु याबाबतच्या चारदा निविदा काढूनही कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे यासाठी जलप्रदाय विभागालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देचारदा निविदा काढूनही प्रतिसाद नाही : महत्त्वाच्या ठिकाणी ११६ हायड्रन्ट लावणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात आगीची घटना घडल्यानंतर होणारी धावपळ टाळण्यासाठी व वेळीच आग आटोक्यात यावी यासाठी अग्निशमन विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ११६ हायड्रन्ट लावण्याचे प्रस्तावित आहे. परंतु याबाबतच्या चारदा निविदा काढूनही कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे यासाठी जलप्रदाय विभागालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.१९४७ च्या सुमारास शहरात एक हजार हायड्रन्ट होते. कुठे आग लागल्यास रस्त्याच्या शेजारी असलेल्या या हायड्रन्टमधून अग्निशमनच्या बंबांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची सोय होती. त्यामुळे पाण्याने भरलेल्या बंबांची प्रतीक्षा करावी लागत नव्हती. कालांतराने शहराचा विकास झाला. रस्ते रुंद झाले. या रस्त्यांच्या कामात हायड्रन्ट हरवले.शहरात कोणत्याही भागात आग लागल्यास हायड्रन्टमुळे पाणी उपलब्ध होत होते. मात्र, गतकाळात याकडे दुर्लक्ष झाले. पाईपलाईन टाकताना असलेल्या हायड्रन्टला जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे आज शहरात केवळ १३ हायड्रन्ट उरले आहेत. शहराच्या सर्व भागात हायड्रन्ट नसल्याने आग लागल्यास अग्निशमन विभागाला धावपळ करून जलकुंभांवरून पाणी भरावे लागते. याला अनेकदा वेळ लागतो. अशापरिस्थितीत आगीमुळे मोठे नुकसान होते. याचा विचार करता अग्निशमन व जलप्रदाय विभागाने शहरात संयुक्त सर्वेक्षण करून हायड्रन्टसाठी ११६ ठिकाणे निश्चित केली. जलप्रदाय समिती व स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर जलप्रदाय विभागाने याबाबतच्या ४९.९९ लाखांच्या निविदा काढल्या, परंतु चारवेळा निविदा काढूनही कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही.शहराची लोकसंख्या आज ४० लाखाच्या घरात पोहचली आहे. मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने इमारतींची संख्या वाढली आहे. शहराचा झालेला विस्तार व वाढलेल्या इमारती विचारात घेता, हायड्रन्टची गरज निर्माण झाली आहे.अग्निशमन विभागाने हायड्रन्ट लावण्यासाठी ११६ जागांची निवड केली आहे. यातील ११६ नवीन फायर हायड्रन्ट लावण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्ताव तयार करताना नवीन हायड्रन्ट लावण्यासोबतच बंद असलेल्या व दुरुस्त करण्याजोग्या हायड्रन्टची दुरुस्ती केली जाणार आहे. नवीन ११६ हायड्रन्ट उभारण्याकरिता ४९.९९ लाखांची निविदा काढण्यात आली, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे आजवर जलप्रदाय विभागाने याकडे लक्ष दिले नव्हते. आता निविदा काढल्या तर कंत्राटदारांचा प्रतिसाद नाही. त्यामुळे यासाठी जलप्रदाय विभागालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfireआग