शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सीताबर्डी किल्ल्यात मनपाला सामान ठेवण्याला सैन्य अधिकाऱ्यांची बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:02 IST

शहराच्या मध्यवर्ती भागातील सीताबर्डी किल्ल्यातील महापालिकेच्या गोदामात जप्त केलेले सामान ठेवण्याला सैन्याच्या अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या माहितीनुसार आता प्रवर्तन विभागाकडे जप्त केलेले सामान सुरक्षित ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई संथ पडली आहे.

ठळक मुद्देमनपा अधिकारी घेताहेत कराराच्या कागदपत्रांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील सीताबर्डी किल्ल्यातील महापालिकेच्या गोदामात जप्त केलेले सामान ठेवण्याला सैन्याच्या अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या माहितीनुसार आता प्रवर्तन विभागाकडे जप्त केलेले सामान सुरक्षित ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई संथ पडली आहे.काही दिवसापूर्वी सीताबर्डी किल्ल्याच्या ११८ बटालियन (सैन्य)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फक्त जलकुंभाची देखभाल करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना प्रवेशाला बंदी घातली आहे. जप्त करण्यात आलेल्या सामानाचे ट्रक किल्ल्यातील गोदामापर्यंत सोडण्याला नकार दिला आहे.दरम्यान झोन क्षेत्रात अतिक्रमण कारवाई दरम्यान जत्प करण्यात आलेले साहित्य झोन कार्यालयांच्या परिसरात ठेवले जात आहे. परंतु येथे पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अतिक्रमण कारवाईवर परिणाम झाला आहे. महापालिका सूत्रांच्या माहितीनुसार १९७५ सालापासून किल्ला क्षेत्रात महापालिकेचा जलकुंभ व गोदाम आहे. गोदामापर्यत ये-जा करण्यासाठी महापालिकेने रस्त्यावर १५ ते १६ लाखांचा खर्च केला आहे. आता ४४ वर्षानंतर महापालिका कर्मचाºयांना आत जाण्याला बंदी घातली आहे. या संदर्भात कर्नल राज वेलू यांची महापालिका अधिकाऱ्यांनी भेट घेतली. परंतु सुनावणी झाली नाही. परंतु १९७५ साली महापालिकेला जलकुंभ व गोदाम निर्माण करण्यासाठी परवानगी देताना करार झाला असेल. याचा विचार करता मालमत्ता विभागातील अधिकारी याबाबतचे दस्तावेज शोधत आहेत.भांडेवाडी येथे शेडचा प्रस्ताव पण सुरक्षेचा प्रश्नमहापालिके चा प्रवर्तन विभाग कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य ठेवण्यासाठी भांडेवाडी येथे शेड उभारण्याच्या विचारात आहे. परंतु अधिकाऱ्यांपुढे सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य काही दिवसानंतर दंड आकारून परत केले जाते. त्यामुळे भांडेवाडी येथून साहित्य चोरीला गेले तर दुकानदारांना साहित्य परत कसे करणार, असा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे अडचणी निर्माण होणार आहे.सैन्य अधिकाऱ्यांची भेट घेतलीकिल्ल्यातील गोदामात मोठ्याप्रमाणा भंगार जमा झाले आहे. त्यामुळे सैन्यातील अधिकाऱ्यांनी जुने भंगार निकाली काढण्यास सांगितले होते. त्यानुसार जुन्या जप्त साहित्याचा लिलाव क रण्याची प्रक्रिया करण्यात आली. मात्र दररोजच्या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य ठेवण्याला मनाई करण्यात आल्याची माहिती प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांनी दिली. वरिष्ठ अधिकारी कर्नल राज वेलू यांची भेट घेतली. परंतु त्यांनी साहित्य ठेवण्याला नकार दिला आहे. या संदर्भात राज वेलू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकारी वा संरक्षण विभागाशी संपर्क करण्यास सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर