शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरींच्या पत्नी कांचन यांच्याकडून अनोखा प्रयोग, एक किलो वजनाच्या कांद्याचे उत्पादन

By योगेश पांडे | Updated: May 29, 2025 18:00 IST

Nagpur : एका एकरात घेतले १२ ते १३ टन उत्पादन

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी नागपूरच्या धापेवाडा येथे ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाच्या कांद्याचे उत्पादन केले आहे. गडकरी यांनी स्वत: सोशल माध्यमांतून ही माहिती दिली आहे.

धापेवाडा येथील भक्ती फार्म येथे हा प्रयोग करण्यात आला. गडकरी यांनीच बियाणे, वापरलेले तंत्रज्ञान याबाबत व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली. बियाणे नेदरलँड्समधून आणले गेले होते. २.५ किलो बियाणे एक एकर जमिनीत पेरण्यात आले. तेथे ४५ दिवसांसाठी रोपवाटिका तयार करण्यात आली. त्यानंतर, वाढलेली रोपे दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आली. दुहेरी ठिबक सिंचन करण्यात आल्यावर त्या मातीत सेंद्रिय खत मिसळण्यात आले. त्यानंतर, तेथे मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यात २५ मायक्रॉन प्लास्टिक फिल्मचा समावेश असतो. त्यात छिद्रे पाडून सुमारे २४ हजार रोपे लावण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे जमिनीचा ओलावा कायम राहतो. तसेच जमिनीचे तापमान संतुलित राहते. उत्पादित झालेल्या एका कांद्याचे सरासरी वजन ४०० ग्रॅम ते ८००-१००० ग्रॅम आहे. एका एकरातून १२ ते १३ टन उत्पादन घेतले आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. जर कोणत्याही शेतकऱ्याला अशा प्रकारे सेंद्रिय शेती करायची असेल तर आम्ही त्याला पूर्ण मदत करू, असा दावा नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.खरीप हंगामात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तथापि, कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर कांद्याचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे देशात कांद्याची टंचाई निर्माण होते आणि भाव वाढतात. नाशिक, पुणे आणि सोलापूर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीfarmingशेतीnagpurनागपूर