शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये निर्भया पथक स्थापन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 18:50 IST

राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील सर्वच जिल्ह्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत केली.

ठळक मुद्देगृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील सर्वच जिल्ह्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत केली.राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार आणि सुरक्षेच्या मुद्यावर डॉ.नीलम गोऱ्हे , विद्या चव्हाण, हुस्नबानू खलिफे, स्मिता वाघ यांनी अल्पकालीन चर्चेची मागणी केली होती. या चर्चेला उत्तर देताना केसरकर यांनी ही घोषणा केली.राज्यातील पोलिसांमध्ये संवेदनशीलता वाढविण्याची आवश्यकता आहे. बलात्कार करणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातदेखील कायद्यात बदल करण्याची गरज असून असे कृत्यकरणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करावी, अशी मागणी डॉ.गोऱ्हे  यांनी केली. महिला महाविद्यालयात निर्भया पथकाची देखरेख असावी, असा मुद्दा खलिफे व स्मिता वाघ यांनी मांडला. बाल व महिला गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने व्हावा यासाठी अगोदर सात जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पथक सुरू करण्यात आले होते. आता सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये निर्भया पथकाची स्थापना करण्यात येईल. प्रत्येक पथकामध्ये एक पोलीस अधीक्षक, चार अधिकारी, दोन हवालदार, दोन नाईक, आठ पोलीस शिपाई यांचा समावेश राहील. केवळ बालक आणि महिलांच्या गुन्ह्यांचा तपास हे पथक करेल. हे पथक आपला अहवाल थेट पोलीस महासंचालकांना सादर करेल. तसेच निर्भया पथकाची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन जागृती करण्यात येईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.ठाण्यात आणखी रेल्वे गार्डची आवश्यकतामुंबईत लोकलमधील महिलांच्या डब्यात सुरक्षेसाठी एक ‘गार्ड’ असतो. मात्र ठाण्यात झालेल्या काही घटनांनंतर ‘गार्ड’ची कमतरता समोर आली आहे. महिलांच्या डब्यांमध्ये नेमण्यासाठी ८५० ‘गार्ड’ची मागणी रेल्वे मंडळाकडे केली आहे, अशी माहिती केसरकर यांनी यावेळी दिली. गर्दी नसतानादेखील महिलांचा डबा सर्वसाधारण करण्यात येणार नाही, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले.

टॅग्स :ministerमंत्रीHomeघर