शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:00 IST

नववीत शिकणाऱ्या  एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचपावलीतील बारसेनगरात शनिवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देमोबाईल मिळाला नाही म्हणून लावला गळफास : पाचपावलीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नववीत शिकणाऱ्या  एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचपावलीतील बारसेनगरात शनिवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.संचित संजय वाघमारे (वय १४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे आई-वडील हातमजुरी करतात. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. गरीब परिवारातील वाघमारे दाम्पत्याने संचितसोबत होळी आणि धुळवडीचा सण कसाबसा साजरा केला. संचित पाचपावलीतील सिंधी-हिंदी शाळेत शिकत होता. अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे आपल्याकडेही मोबाईल असावा, असे त्याला वाटत होते. मात्र, घरची जेमतेम परिस्थिती पाहून तो मन मारून राहत होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून त्याची मोबाईलची इच्छा फारच तीव्र झाली होती. आई-वडिलांना त्याने मोबाईल घेऊन देण्याची विनंतीही केली होती. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आई-वडिलांनी त्याची समजूत काढून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. संचित वरून शांत झाल्याचे दिसत असला तरी आतून अस्वस्थ होता. शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास त्याने गळफास लावून घेतला. आई-वडील घरी परतल्यानंतर त्याचा मृतदेह लटकल्याचे पाहून त्यांनी हंबरडा फोडला. एकुलत्या एक मुलाने अवघ्या १४ व्या वर्षीच आत्मघात केल्याने आई-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. संचितने शिकून खूप मोठा अधिकारी बनावे, असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, संचितच्या आत्मघाताने त्यांचे स्वप्न चिरडल्या गेले. माहिती कळताच शेजाऱ्यांनी वाघमारेंच्या घरासमोर मोठी गर्दी केली. पोलिसांनाही कळविण्यात आले. पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने संचितच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र काही ठोस हाती लागले नाही. आठ-दहा दिवसांपूर्वी संचितने मोबाईल घेऊन मागितला होता. नकार दिल्याने तो अस्वस्थ झाला होता. याच कारणामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीSuicideआत्महत्या