शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात नऊ तरुणांना जलसमाधी; स्वातंत्र्य दिनाच्या पर्यटनाेत्सवावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 11:43 IST

Nagpur News स्वातंत्र्य दिनाची सुटी एंजाॅय करण्यासाठी म्हणून पर्यटनावर जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. मात्र यावर्षी विदर्भातील पर्यटनाेत्सवावर विरजण पडले. वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ तरुणांचा बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देउमरेडच्या दाेन सख्ख्या भावांचा मृतांत समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्य दिनाची सुटी एंजाॅय करण्यासाठी म्हणून पर्यटनावर जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. मात्र यावर्षी विदर्भातील पर्यटनाेत्सवावर विरजण पडले. वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ तरुणांचा बुडून मृत्यू झाला. त्यामध्ये गाेसेखुर्द जलाशयात दाेन सख्ख्या भावांचा, चिखलदऱ्यातील दाेन घटनांत तिघांचा, आसाेलामेंढा (जि. चंद्रपूर) तलावात दाेन मित्रांचा, सालबर्डी (जि. अमरावती) येथे जलालखेडा (जि. नागपूर) येथील तरुणाचा तर गाेंदियातील रावणवाडीतील एकाचा समावेश आहे.

सावली (जि. चंद्रपूर) तालुक्यातील पाथरी येथील आसोलामेंढा तलावाच्या नहरात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना स्वातंत्र्य दिनी दुपारच्या सुमारास घडली. पाथरी येथील सूरज नानाजी नेवारे (वय २०), तर गडचिरोली जिल्ह्यातील बामणी येथील सोनू पितांबर सोरते (२५) अशी मृत तरुणांची नावे आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाने आसोलामेंढा पर्यटन सध्या शासनाने बंद केले आहे. मात्र, दोन्ही तरुणांनी पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पोलिसांची नजर चुकवून आठ फूट खोल असलेल्या नहरात उडी घेतली. पाण्याची पातळी व प्रवाह जास्त असल्याने सोनू गटांगळ्या खाऊ लागल्याने त्याला वाचविण्यासाठी सूरजने आरडाओरड करीत नहरात उडी मारली. तो प्रवाहातून सोनूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचवेळेस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस शिपाई राजू केवट, किशोर वाघमारे, दुर्गेश नन्नावरे व पाथरी येथील युवक विवेक ठाकरे यांनी पाण्यात उडी घेऊन त्या दोघांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. दोघांनाही जलसमाधी मिळाली.

चिखलदरा (जि. अमरावती) पर्यटन स्थळावर फिरायला आलेल्या अकोला येथील दोन पर्यटकांचा जत्रा डोहात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. मित्र बुडाल्याचे पाहून वाचविणाऱ्यांपैकी दोघांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथील अंघोळीसाठी डोहात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. शेख इकरम शेख हुसेन कुरेशी (२६) व शेख आजीम शेख सकुर (२७, अकोट फैल अकोला) अशी मृतांची नावे आहेत. एमएच-३०/एझेड-४६२६ व एमएच-०४/एफएफ-४१२४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने नऊ मित्र आले होते. सर्व मित्र जत्राडोह पॉइंट येथील कोसळणाऱ्या धबधब्याखाली डोहात अंघोळीसाठी उतरले. पैकी दोघे डोहातील खोल पाण्यात बुडाले. सहकारी मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला; पण निष्फळ ठरला. दुसऱ्या एका घटनेत चिखलदरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोपटखेडा खटकाली मार्गावरील पीर बाबा नदीच्या डोहात बुडून हरीश जानराव काळमेघ (३८, रा. चौसाळा, तालुका अंजनगाव) याचा मृत्यू झाला.

सालबर्डी येथील हत्तीडाेहात बुडून विशाल राजेंद्र कांबळे (२१, रा. जलालखेडा, ता. नरखेड, जि. नागपूर) या तरुणाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. याशिवाय गाेंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रजेगाव घाट येथे कावड यात्रेत सहभागी असलेल्या भाविकाचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. प्रमोद वंजारी (३६, रा. रजेगाव) असे मृताचे नाव आहे.

सेल्फीच्या नादात सख्खे भाऊ बुडाले

मित्रांसोबत गोसेखुर्द धरणावर आलेल्या उमरेड (जि. नागपूर) येथील दोन सख्ख्या भावंडांचा सेल्फी काढताना वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना १५ ऑगस्टच्या दिवशी घडली. मंगेश मधुकर जुनघरे (वय ३७) व विनोद मधुकर जुनघरे (३५, दोघेही रा. रेवतकर ले आउट उमरेड, जि. नागपूर) येथील रहिवासी आहेत. नदीच्या काठावर बसून सेल्फी काढत असताना विनोदचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. खोल व पाण्याला प्रवाह जास्त असल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. लहान भाऊ पाण्यात पडून बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ मंगेश याने जिवाची पर्वा न करता वैनगंगेच्या पात्रात उडी घेतली. मात्र, मंगेश विनोदचा आणि स्वत:चाही जीव वाचवू शकला नाही. वैनगंगेच्या पात्रात दोन्ही भावंडांना जलसमाधी मिळाली.

टॅग्स :Deathमृत्यू