नागपुरातून चीनकडे उड्डाण भरणार नऊ विमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 10:31 AM2018-09-20T10:31:51+5:302018-09-20T10:35:12+5:30

सौदी अरबच्या वायुसेनेच्या दोन वैमानिकांची बुधवारी सायंकाळी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. २८ आॅक्टोबरला सौदी वायुसेनेची नऊ विमाने नागपूर विमानतळावर इंधन (एटीएफ) भरणार आहेत.

Nine planes flying from Nagpur to China | नागपुरातून चीनकडे उड्डाण भरणार नऊ विमाने

नागपुरातून चीनकडे उड्डाण भरणार नऊ विमाने

Next
ठळक मुद्देएएआय अधिकाऱ्यांना भेटले सौदी एअरफोर्सचे वैमानिक

वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सौदी अरबच्या वायुसेनेच्या दोन वैमानिकांची बुधवारी सायंकाळी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय)
अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. २८ आॅक्टोबरला सौदी वायुसेनेची नऊ विमाने नागपूर विमानतळावर इंधन (एटीएफ) भरणार आहेत. इंधन भरल्यानंतर ही विमाने थेट चीनच्या ज्युहाई शहरात आयोजित हवाई शोमध्ये सहभागी होणार आहेत.
खाडी देश जगाला स्वस्त दरात पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करते, पण त्यांना दुसऱ्या ठिकाणी इंधन भरावे लागत आहे. नागपुरात अन्य शहरांच्या तुलनेत पेट्रोलचे भाव जास्त आहेत. पण हवाई इंधनासाठी ही बाब महत्त्वाची ठरत नाही.

Web Title: Nine planes flying from Nagpur to China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.