शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

नीलेश भरणे यांच्याकडे ‘क्राईम ब्रँच’ची जबाबदारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:14 IST

वाहतूक शाखेचे डीसीपी नीलेश भरणे यांना गुन्हे शाखेची (क्राईम ब्रँच) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी बुधवारी रात्री यासंबंधीचे आदेश जरी केले आहेत. भरणे यांच्या नियुक्तीसोबतच बुधवारी गुन्हे शाखेतून रवींद्र कदम यांना कार्यमुक्त करण्यात आले. कदम यांची गेल्या आठवड्यात पुणे येथे बदली झाली आहे.

ठळक मुद्देराजमाने यांना वाहतूक शाखेचा अतिरिक्त कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूक शाखेचे डीसीपी नीलेश भरणे यांना गुन्हे शाखेची (क्राईम ब्रँच) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी बुधवारी रात्री यासंबंधीचे आदेश जरी केले आहेत. भरणे यांच्या नियुक्तीसोबतच बुधवारी गुन्हे शाखेतून रवींद्र कदम यांना कार्यमुक्त करण्यात आले. कदम यांची गेल्या आठवड्यात पुणे येथे बदली झाली आहे.भरणे हे भारतीय पोलीस सेवेच्या २००५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे उत्तराखंड कॅडरचे अधिकारी आहे. त्यांची प्रतिनियुक्तीवर नागपूरला बदली करण्यात आली आहे. त्यांना १ मे २०१७ रोजी विशेष शाखेच नियुक्ती देण्यात आली होती. येथे तैनातीदरम्यान २४ तासात पासपोर्ट व्हेरिफिकेशनची तपासणी पूर्ण करण्याचा रेकॉर्ड बनवण्यात आला होता. त्यांच्या या कार्याचे देशभरात कौतुक करण्यात आले होते. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांना झोन चारमध्ये तैनात करण्यात आले. गुन्ह्यांच्या बाबतीत झोन चार अतिशय संवेदनशील आहे. भरणे यांनी येथील अवैध धंदे आणि गुन्हेगारांच्या विरुद्ध व्यापक कारवाई केली. त्यांच्या कार्यशैलीमुळे झोन चारच्या गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली होती. गेल्या २१ फेब्रुवारी रोजी त्याची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली. येथे सुद्धा आठवडाभरातच त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक उपाय केले. मंगळवारी जामठा येथे झालेल्या भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यादरम्यान पहिल्यांदाच वर्धा रोडवर वाहतूक जाम झाली नाही. नागरिकांना त्रास सहन करावा लागला नाही.भरणे हे मूळचे नागपूरचेच असल्याने येथील गुन्हेगरी रोखण्यास ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. निवडणुकांदरम्यान गुन्हेगारी तत्त्व सक्रिय होतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे पोलिसांसाठीही आव्हानात्मक असते. पोलिसांनी निवडणुकांदरम्यान गडबड करू शकणाऱ्या गुन्हेगारांची एक यादी तयार केली आहे. त्याची लवकरच धरपकड होणार आहे. अनेक वर्षानंतर गुन्हे शाखेमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून स्थानिक अधिकाऱ्याला नियुक्त करण्यात आले आहे. भरणे यांच्या बदलीनंतर डीसीपी मुख्यालय गजानन राजमाने यांच्याकडे वाहतूक शाखेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

नंदनवार बनले नवे एसीपी  त्याचप्रकारे विशेष शाखेचे एसीबी सुधीर नंदनवार यांनाही गुन्हे शाखेत पाठवण्यात आले आहे. नंदनवार सुद्धा शहरातील अनुभवी अधिकारी आहेत. त्यांनी तहसील, नंदनवन, बजाजनगरचे ठाणेदार म्हणून कार्य केले आहे. एसीपी पदोन्नतीवर त्यांना बजाजनगर येथून विशेष शाखेत नियुक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयTransferबदली