शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘डिजीटल’ विद्यापीठासाठी पुढचे पाऊल, विद्यार्थ्यांना भरता येणार ‘आॅनलाईन’ शुल्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 22:18 IST

नागपूर, दि. ३१ -निकालांमध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांना मागे टाकणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘डिजीटलायझेशन’कडे आणखी एक पाऊल टाकले आहे. विद्यार्थ्यांना आता घरबसल्या विविध प्रकारची शुल्क ‘आॅनलाईन’ माध्यमातून भरता येणार आहे. तसेच १९५० पासूनची निकालपत्रेदेखील ‘ई’ स्वरुपात संरक्षित करण्यात येणार आहे. ‘ई’ शुल्काचा मुद्दा ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरला होता हे ...

नागपूर, दि. ३१ -निकालांमध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांना मागे टाकणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘डिजीटलायझेशन’कडे आणखी एक पाऊल टाकले आहे. विद्यार्थ्यांना आता घरबसल्या विविध प्रकारची शुल्क ‘आॅनलाईन’ माध्यमातून भरता येणार आहे. तसेच १९५० पासूनची निकालपत्रेदेखील ‘ई’ स्वरुपात संरक्षित करण्यात येणार आहे. ‘ई’ शुल्काचा मुद्दा ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरला होता हे विशेष. नागपूर विद्यापीठात ‘ई-रिफॉर्म्स’चे विविध प्रयत्न सुरू आहेत. नागपूर विद्यापीठात विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे तसेच संशोधनासंदर्भातील विविध शुल्क भरण्यासाठी दररोज विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते. परीक्षा भवन तसेच ‘कॅम्पस’मध्ये शुल्क भरण्यासाठी केंद्र उघडण्यात आली आहेत. परंतु या केंद्रांवर अनेकदा गर्दीच असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रांगेमध्ये ताटकळत उभे रहावे लागते. शिवाय ऊन, पावसात त्यांची उगाच पायपीटदेखील होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा तर केवळ शुल्क भरण्यासाठी एक दिवस वाया जातो. हीच बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या वित्त विभागात ‘आॅनलाईन’ शुल्क भरण्याची सुविधा व्हावी अशी मागणी समोर येऊ लागली होती. याअंतर्गत अखेर वित्त विभागाच्या ‘ईआरपी’ला (एन्टरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग) एका खासगी बँकेच्या ‘गेटवे‘सोबत जोडण्यात आले आहे. याअंतर्गत सुमारे १० ते १२ प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ भरता येणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना शुल्क भरल्याच्या पावतीचे ‘प्रिंट आऊट’ व आवश्यक कागदपत्रे विद्यापीठात सादर करावी लागतील. मंगळवारपासून ही प्रणाली सुरू होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. संकेतस्थळावर उपलब्ध प्रामुख्याने द्वितीय गुणपत्रिका, प्रवजन प्रमाणपत्र, गुणपत्रिका किंवा पदवी पडताळणी, पात्रता प्रमाणपत्र इत्यादीसाठीचे शुल्क ‘आॅ़नलाईन’ माध्यमातून भरता येणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘रिझल्ट’च्या ‘लिंक’मध्ये गेल्यावर ‘फॉर्म्स सेंट्रल’वर ‘क्लिक’ केल्यावर नोंदणी करता येईल. आवश्यक माहिती भरल्यानंतर ‘पेमेन्ट गेटवे’ उघडेल. ३ टप्प्यांत कागदपत्रांचे ‘डिजीटलायझेशन’ राज्य शासनाच्या अग्रवाल समितीने ‘ई-रिफॉर्म्स’संदर्भात अनेक सूचना केल्या होत्या. त्यात कागदपत्रांचे ‘डिजीटलायझेशन’ हादेखील मुद्दा होता. याबाबतीत नागपूर विद्यापीठाने पाऊल उचलले असून निकालपत्र आणि गुणांचा तपशील ‘ई’ स्वरुपात संरक्षित करण्यात येणार आहे. १९५० पासूनच्या कागदपत्रांचा यात समावेश असून ३ टप्प्यांत हे काम चालेल. अगोदर २००१ ते २०१६, त्यानंतर १९७६ ते २००० व अखेरच्या टप्प्यात १९५० ते १९७५ या कालावधीतील निकालपत्रांना ‘डिजीटल’ स्वरुप देण्यात येईल. यासंदर्भात लवकरच निवीदा प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.