शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वर्तमानपत्रांनी सर्वसमावेशक असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:13 IST

वर्तमानपत्रांनी सर्वसमावेशक असायला पाहीजे. यामुळे वाचकांपर्यंत निष्पक्ष आणि खऱ्या बातम्या पोहोचविणे शक्य असते, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार आणि आरएसएस विचारवंत मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमा.गो. वैद्य यांचे मनोगत : माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठातर्फे डी.लिट. पदवीने गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्तमानपत्रांनी सर्वसमावेशक असायला पाहीजे. यामुळे वाचकांपर्यंत निष्पक्ष आणि खऱ्या बातम्या पोहोचविणे शक्य असते, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार आणि आरएसएस विचारवंत मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले.माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता व संचार विद्यापीठ, भोपाळच्यावतीने बुधवारी वैद्य यांना विद्यावाचस्पती (डी.लिट.) पदवी प्रदान करण्यात आली. नुकताच भोपाळ येथे विद्यापीठाचा दीक्षांत समारोह पार पडला. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे मा.गो. वैद्य समारोहात सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे विद्यापीठाने नागपूरला लक्ष्मीनगर येथील सभागृहात हा पदवीदान समारंभ आयोजित करून त्यांचा गौरव केला. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विद्यापीठाने ही मानद पदवी देऊन त्यांना सन्मानित केले. विद्यापीठाचे कुलगुरू जगदीश उपासने समारोहाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. याप्रसंगी सुनंदा वैद्य, विद्यापीठाचे कुलाधिसचिव लाजपत आहुजा, कुलसचिव संजय द्विवेदी प्रामुख्याने उपस्थित होते.मा. गो. वैद्य पुढे म्हणाले, वर्तमानपत्रात मुख्य संपादक झाल्यानंतर आपण हा प्रयोग केला होता आणि तो यशस्वीही ठरला. याप्रयोगानुसार संपादकीय मंडळात विविध राजकीय पक्षांची विचारधारा मानणाऱ्यांना नियुक्त केले होते. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले होते. मात्र सर्वांना एक विश्वास दिल्याचे त्यांनी सांगितले. आपणास कधी पत्रकार व्हावे असे वाटत नव्हते. करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली होती. या शिक्षकी पेशात असताना पत्रकार होण्याची संधी प्राप्त झाली. आपण अपघातानेच पत्रकार झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शिक्षक आणि पत्रकारितेतील अनेक अनुभव उपस्थितांसमोर मांडले.अध्यक्षीय भाषण करताना विद्यापीठाचे कुलगुरू उपासने म्हणाले, शिक्षक आणि संपादक जेथे असेल तेथे सुधारणा नक्की होतात. लेखक आणि चिंतन करणाऱ्यांच्या लेखनातून सकारात्मक परिणाम समाजात दिसून येतात. मा.गो. वैद्य शिक्षक, लेखक आणि विचारवंत असण्यासह पत्रकारही आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात व्यापकता असल्याचे उपासने म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन संजय द्विवेदी यांनी केले. विद्यापीठाचे सहायक कुलसचिव गिरीश जोशी यांनी आभार मानले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर