शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेचा तिसऱ्या माळ्यावरून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2023 22:46 IST

Nagpur News घराच्या तिसऱ्या माळ्यावरून काेसळून नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना सावनेर शहरात शनिवारी (दि. ११) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देसंशयास्पद मृत्यूमुळे उलटसुलट चर्चेला उधाण

नागपूर: घराच्या तिसऱ्या माळ्यावरून काेसळून नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना सावनेर शहरात शनिवारी (दि. ११) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ती नेमकी कशी काेसळली, याबाबत कुणालाही माहिती नाही, शिवाय या घटनेबाबत परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सुषमा नरेश इंगळे असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. ती मूळची वाठाेडा, नागपूर येथील रहिवासी असून, पती नरेश सावनेर शहरात नाेकरी करीत असल्याने, ती पतीसाेबत शहरातील जटाशंकर ले-आउटमध्ये किरायाने राहायची. त्या दाेघांचेही १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले हाेते. ती इमारतीवरून काेसळल्याची माहिती मिळताच, हितेश बन्साेड यांनी घटनास्थळ गाठत पाेलिसांना सूचना दिली.

हितेश यांनी लगेच जखमी अवस्थेत तिला सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तिला तपासणीअंत मृत घाेषित केले. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरात पाठविण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी सावनेर पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

शरीरावर ओरबाडल्याच्या खुणा

मृत सुषमाच्या हात व पाेटावर ओरबाडल्याच्या खुणा असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली असून, तिच्या खाेलीत, तसेच धारदार काचेवर रक्ताचे डाग असल्याचे सांगितले. याला पाेलिसांनी खासगीत दुजाेरा दिला आहे. उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तिच्या मृत्यूच्या कारणासाेबत अन्य महत्त्वाच्या बाबी उघड हाेणार असल्याची माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यू