शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

बाबासाहेबांनी विकसित केले इतिहासातील नवीन सिद्धांत

By admin | Updated: March 23, 2015 02:37 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान इतिहासकार सुद्धा होते. त्यांनी केवळ इतिहासाचे लेखनच केले नाही,

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान इतिहासकार सुद्धा होते. त्यांनी केवळ इतिहासाचे लेखनच केले नाही, तर इतिहासाचे संशोधन करीत असताना त्यांनी अनेक नवीन सिद्धांतही मांडले आणि ते विकसित केले आहेत. त्यांच्या सिद्धांताला इतिहासाच्या क्षेत्रात आज जगभरात मान्यता मिळाली असून इतिहासाचा अभ्यास करीत असताना या सिद्धांतांचा विचार करावा लागत आहे, असे प्रतिपादन इतिहासकार व हरियाणा कुरुक्षेत्र विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रो. डॉ. एस.के. चहल यांनी शुक्रवारी येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दीक्षांत सभागृहात आयोजित दोन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचा शुक्रवारी सायंकाळी समारोप करण्यात आला. ‘इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर डॉ. चहल मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते. व्यासपीठावर डॉ. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे होते. डॉ. चहल म्हणाले, भारताचा इतिहास लिहिला गेला तेव्हा त्यात दलित व महिलांना कुठलेच स्थान मिळाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या प्राचिन इतिहासावर बरेच संशोधन केले. केवळ संशोधनच केले नाही, तर इतिहासाचे लेखन करताना नवीन सिद्धांत विकसित केले. त्यांच्या इतिहास लेखणीचा नायक हा सर्वसामान्य व्यक्ती होता. दलित होते. शोषित होते. महिला होत्या. ‘शुद्र पूर्वी कोण होते’, ‘रिडल्स आॅफ हिंदुईझम’, ‘द अनटचेबल’ यासारख्या अनेक ऐतिहासिक संशोधनपर ग्रंथाद्वारे त्यांनी प्राचिन भारतातील जाती व्यवस्थेवर प्रकाश टाकला. क्रांती अणि प्रतिक्रांतीसारखा ग्रंथ लिहून त्यांनी इतिहासातील नवे सिद्धांत निर्माण केले. भारताच्या फाळणीवर प्रकाश टाकणारा थॉट्स आॅन पाकिस्तानसारखा ऐतिहासिक ग्रंथ त्यांनी लिहिला. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्रासह भारतीय राजकारण, संविधानाची निर्मिती यासोबतच भारताच्या इतिहास संशोधनातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अमूल्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. मुरलीधर चांदेकर यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रमेश शंभरकर यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)