शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

रंजनकुमार शर्मा सीआयडीचे नवे अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:00 IST

तब्बल चार वर्षे नागपुरात विविध पदांवर काम करणारे आणि हसतमुख अधिकारी म्हणून ओळखले जाणारे रंजनकुमार शर्मा यांची पुन्हा नागपुरात बदली झाली आहे. ते आता गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यातील अधीक्षक, महानिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात शर्मा यांचीही बदली करण्यात आली.

ठळक मुद्देशुक्रवारी सांभाळणार पदभार : नागपुरात तिसऱ्यांदा नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल चार वर्षे नागपुरात विविध पदांवर काम करणारे आणि हसतमुख अधिकारी म्हणून ओळखले जाणारे रंजनकुमार शर्मा यांची पुन्हा नागपुरात बदली झाली आहे. ते आता गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यातील अधीक्षक, महानिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात शर्मा यांचीही बदली करण्यात आली.भारतीय पोलीस सेवेतील २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शर्मा २०१२ मध्ये यवतमाळला पोलीस अधीक्षक होते. त्यानंतर ते तेथून राज्य राखीव दलाचे कमांडंट म्हणून नागपुरात बदलून आले. तेथून त्यांची २०१५ मध्ये शहरात पोलीस उपायुक्त इमिग्रेशन म्हणून बदली झाली. तीन महिन्यानंतर त्यांना गुन्हे शाखेची (डिटेक्शन) जबाबदारी देण्यात आली. अनेक मोठमोठी प्रकरणे त्यांनी उघड करून कुख्यात गुंडांना अटक केली. २०१७ मध्ये ते नागपुरातून बदलून अहमदनगरला गेले. तेथे त्यांनी दोन वर्षांत अनेक चांगल्या कामगिरी केल्या. पारधी समाजातील ५०० मुलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. अनेक वर्षांपासून पोलिसांच्या नाकीनऊ आणणारा कुख्यात गुन्हेगार चण्या बेग याला अटक करण्याची कामगिरीही त्यांनी बजावली. आता ते सीआयडीचे अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. शुक्रवारपर्यंत आपण नागपुरात येऊन पदाची जबाबदारी सांभाळू, असे ते लोकमतशी बोलताना म्हणाले.

टॅग्स :Criminal Investigation Department CIDराज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडीnagpurनागपूर